✒️पंकज रामटेके(विशेष प्रतिनिधी)
घुग्घुस(दि.16डिसेंबर):- दि. १५ डिसेंबर २०२२ रोजी उमेश सोंडुले यांची आई स्मृतीशेष गीताबाई शालिकराम सोंडुले यांच्या दि. १० डिसेंबर २०२२ रोजी मृत्यू झाले असता. मुलगा उमेश शालीकराम सोंडुले यांनी अध्यक्ष सुरेशभाऊ मल्हारी पाईकराव विहार बांधकाम कोषाध्यक्ष हेमंतभाऊ आनंदराव पाझारे यांच्या संकल्पना लक्षात घेता थोडक्यात कार्यक्रम करुन भारतीय बौद्ध महसभा नगर शाखा घुग्घुसचे अध्यक्ष सुरेश मल्हारी पाईकराव विहार बांधकाम कोषाध्यक्ष हेमंत आनंदराव पाझारे कार्याध्यक्ष चंद्रगुप्त घागरगुंडे याच्याकडे पाच हजार रुपये दान दिले.
पंचशील चौक घुग्घुस येथे नवीन विहार बांधकाम सुरू असता अध्यक्ष सुरेश मल्हारी पाईकराव विहार बांधकाम कोषाध्यक्ष हेमंत आनंदराव पाझारे यांनी एक संकल्पना नेमली कि आपण पुष्कळ ठिकाणी व्यर्थ पैसा खर्च करतो जसे की कुणी मरण पावल्यास त्याचा तिसरा, दिवस वाढदिवस साजरा करणे असा अनेक ठिकाणी व्यर्थ पैसा खर्च करतो. हे नकरता जर आपण हा पैसा समाजासाठी दान दिला तर त्याचा योग्य वापर करु शकतो असी संकल्पना सुरु केली असता. सुरेश रामटेके यांनी आपल्या आईचा वर्षाचा दिनी त्यांनी ऐकावन हजार (५१,०००/-)रुपये दान दिले, अरुण कांबळे यांनी आपल्या मामाचा तिसरा दिवस नकरता पाच हजार(५,०००/-) रुपये दान दिले, हेमंत आनंदराव पाझारे यांनी आपल्या वडिलाचा वर्षाचा दिवस नकरता पंचवीस हजार (२५,०००/-)रुपये दान दिले शोभाबाई उमरे यांनी मुलाचा वर्षाचा दिवस नकरता पाच हजार (५,०००/-)रुपये दान दिले उज्ज्वल सोनटक्के यांनी आपल्या लहान मुलीचा वाढदिवस नकरता पाच हजार (५,०००/-)रुपये दान दिले.तर आज तसेच सोंडुले परिवारानी सुध्दा आपल्या आई तिसरा दिवसाचा कार्यक्रम थोडक्यात करून पाच हजार रुपये दान दिले.
विहार बांधकामासाठी कोणताही शासकीय निधी नघेता हे विहार बांधकाम फक्त लोक वर्गणीदार यांच्या वर्गणीतुन निर्माण करण्यात येत असून सर्वांनी या विहार बांधकामाचा हिस्सा व्हावे. असे अध्यक्ष सुरेश मल्हारी पाईकराव यांनी सांगितले.
यावेळेस भारतीय बौद्ध महसभा नगर शाखा घुग्घुसचे अध्यक्ष सुरेश मल्हारी पाईकराव विहार बांधकाम कोषाध्यक्ष हेमंत आनंदराव पाझारे कार्याध्यक्ष चंद्रगुप्त घागरगुंडे व उमेश सोंडुले व समस्त बौद्ध बांधव उपस्थित होते