Home चंद्रपूर किरायाने असलेले शासकीय कार्यालय प्रशासकीय भवनात स्थलांतरीत करण्याची श्रमिक एल्गारची मागणी

किरायाने असलेले शासकीय कार्यालय प्रशासकीय भवनात स्थलांतरीत करण्याची श्रमिक एल्गारची मागणी

192

✒️रोशन मदनकर(उप संपादक)

चंद्रपूर(दि.15डिसेंबर):- मूल येथील खाजगी इमारतीत असलेले शासकीय कार्यालय प्रशासकीय भवनात स्थलांतरीत करावे अशी मागणी श्रमिक एल्गारच्या वतीने आज तहसिलदार यांचेकडे केली आहे.

मूल येथे भव्य व सुंदर प्रशासकीय भवन तयार करण्यात आले आहे. ही इमारत नागरीकांच्या सोयीची असून तहसिल कार्यालय, उपविभागीय कार्यालयासह काही कार्यालय या ठिकाणी स्थलांतरीत करण्यात आले असले तरी, महत्वाचे असलेलें दुयम निबंधक कार्यालय व तालुका कृषी कार्यालय मात्र अजूनही लाखो रूपये भाडे देवून खाजगी इमारतीत आहेत. या दोनही कार्यालयासाठी प्रशासकीय भवनात जागा खुली ठेवण्यात आली आहे. प्रशासकीय भवनात कार्यालयासाठी व्यवस्था असतांनाही केवळ अधिकारी यांचे दुर्लक्षतेमुळे लाखो रूपये शासनाचे किरायापोटी जात असल्यांचा आरोप श्रमिक एल्गारने केला आहे.

सर्व शासकीय कार्यालय प्रशासकीय भवनात आले तर, नागरीकांना योजना व सेवा घेण्यास वेळेचे व पैशाची बचत होणार आहे. तहसिल कार्यालय, उपविभागीय कार्यालय, सेतू केंद्र, भुमी अभिलेख कार्यालय, वनविभाग हे एकाच परिसरात असून सर्व कार्यालय याच इमारतीत आणल्यास एकाच कामासाठी नागरीकांना भटकण्यांची वेळ येणार नाही असेही निदेनातून म्हटले आहे.

निवेदन देतांना श्रमिक एल्गारचे केंद्रिय संघटक विजय सिध्दावार, समता परिषदेचे जिल्हाध्यक्ष प्रा. विजय लोनबले, चतुर मोहुर्ले, अमीत राऊत, विवेक मांदाडे, शशीकांत गणवीर, राकेश मोहुर्ले,वनराज पेडुकर, दुर्वास धोंगडे, सतिश राजुरवार, ओमदेव मोहुर्ले, नंदू बारस्कर, अरूण जराते, चित्तरंजन वाढई,

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here