✒️मुंबई प्रतिनिधी(महेश कदम)
मुंबई(दि.15डिसेंबर):-१२ डिसेंबर हा दिवस हुतात्मा दिन म्हणून साजरा केला जातो, हुतात्मा बाबु गेनु स्मृतिदिनाच्या निमित्ताने महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळ, सेनापती बापट मार्ग, प्रभादेवी येथे मा. कार्यसम्राट आमदार श्री. कालिदास कोळंबकर साहेब व महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळाचे अधिकारी, कर्मचारी तसेच जी/ उतर महानगरपालिका यांच्या वतीने साफसफाई स्वच्छता मोहीम चा कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते. कामगार कल्याण आयुक्त मा. श्री. रविराज इळवे व वडाळा विधानसभा उपाध्यक्ष श्री. जितेंद्र कांबळे यांच्या हस्ते हुतात्मा बाबु गेनु यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करण्यात आले. कामगार विकास अधिकारी श्री. श्रीकांत धोत्रे यांनी गुलाब पुष्प देवुन उपस्थितांचे स्वागत केले.
कल्याण आयुक्त यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले व आभार मानले, सदर प्रसंगी (उप- कल्याण आयुक्त) श्री. महेंद्र तायडे, श्री. रवि टोपणे (लेखा व लेखा परीक्षा अधिकारी), श्री. प्रमोद चौधरी (सहाय्यक कल्याण आयुक्त संगणक), श्री. मनोज बागले (प्रसिद्धी व जनसंपर्क अधिकारी), श्रीमती माधवी सुर्वे (सहाय्यक कल्याण आयुक्त), श्रीमती राधिका साळवी (कनिष्ठ आवेशक म.न.पा) तसेच श्री. राजेश जाधव (जिल्हा महामंत्री), श्री. अरविंद इंगळे (जिल्हा सचिव), श्री. अमित मिठबावकर (भाजपा १९४ महामंत्री), श्री. ओमकार गुरव (भाजपा कार्यकर्ते), श्री. संतोष राठोड (गार्डन प्रमुख), श्री. अरुण कणसे (जिल्हा उपाध्यक्ष), श्री. अनंत शिंदे (मुकादम), श्री. अंकित पांडे (किर्ती काॅलेज जी. एम), श्री. संतोष शिंदे (एस.ई.ओ), श्री. प्रविण जाधव (पत्रकार) उपस्थित राहून आपले मनोगत व्यक्त केले. या कार्यक्रमात अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते यांचे सुद्धा सहकार्य लाभले.