Home महाराष्ट्र राज्यात सुव्यवस्था बिघडविणारे चंद्रकांत पाटील यांच्यावर कायदेशीर कारवाई करा- अतिशभाई खराटे

राज्यात सुव्यवस्था बिघडविणारे चंद्रकांत पाटील यांच्यावर कायदेशीर कारवाई करा- अतिशभाई खराटे

172

🔸मनोरुग्ण भाजप उपचारासाठी वंचित आघाडीचे मलकापूर मध्ये भिक मांगो आंदोलन

✒️अकोला(पुरोगामी न्युज नेटवर्क)

अकोला(दि15डिसेंबर):- भाजपा नेते तथा मंत्री चंद्रकांत पाटील यांनी महापुरुषाबाबत केलेल्या बेताल वक्तव्याविरुद्ध निषेध करीत, त्याना मनोरुग्णालयात दाखल करण्यासाठी मलकापूर येथे वंचित बहुजन आघाडीच्या वतीने “मनोरुग्ण भाजप उपचारासाठी भिक मांगो आंदोलन” करण्यात आले.

सदर आंदोलन वंचित बहुजन आघाडीचे जिल्हा महासचिव अतिशभाई खराटे यांच्या प्रमुख मार्गदर्शनात तथा जि. उपाध्यक्ष यशवंत कळासे, जि. संघटक भाऊराव उमाळे, जि. सचिव तुळशीराम वाघ, तालुकाध्यक्ष सुशील मोरे, महिला जि. उपाध्यक्षा रेखाताई नितोने यांचे नेतृत्वात झाले, यावेळी चंद्रकांत पाटील यांच्या विरुद्ध जोरदार घोषणाबाजी करण्यात आली 

यावेळी निषेध व्यक्त करताना जिल्हा महासचिव अतिशभाई खराटे यांनी पैठण येथे ” भाऊराव पाटील, म. जोतिबा फुले, डाँ.बाबासाहेब आंबेडकर यांनी लोकांकडे भिक मागुन शाळा चालू केल्या असे वादग्रस्त विधान करून महापुरुषांचा अवमान चंद्रकांत पाटील यांनी केला व त्यामुळे बहुजन समाजाच्या भावना दुखावणारे व राज्यात सुव्यवस्था बिघडवणारे मंत्री चंद्रकांत पाटील यांच्यावर कायदेशीर कारवाई करुन मंत्री पदावरून हकालपट्टी करावी अशी मागणी केली
तसेच पुणे येथील आंबेडकरी चळवळीतील तरुणांनी शाहीफेक करून निषेध केल्याप्रकरणी राजकीय सत्तेचा दुरूपयोग करून दाखल केलेले गंभीर गुन्हे त्वरित मागे घ्यावे,सदर घटनेसाठी दोषी ठरवलेल्या ११ पोलीस कर्मचाऱ्यांचे निलंबन त्वरीत मागे घ्यावे व पत्रकार गोविंद वाकडे यांच्यावर सुध्दा राजकीय द्वेषातून दाखल केलेला गुन्हा मागे घेण्यात यावा यासाठी महाराष्ट्राचे गृहमंत्री यांना तहसीलदार मलकापूर यांचे मार्फत निवेदन देण्यात आले.

या आंदोलनात विलास तायडे, शांताराम सोनवणे, यासीन कुरेशी प्रवीण इंगळे, मधुकर निकम, सचिन तायडे, भीमराज मोरे, के. यु. बावस्कर, आर.एम. सूर्यवंशी, एस. ओ. तायडे, विजय वानखेडे, नानाराव इंगळे, अजय निकम, उदेभान इंगळे, पि. डी. वाकोडे, शिवसिंग हळदे, राजाराम नितोने, प्रकाश थाटे, अनिल तायडे यांच्यासह आदी सहभागी होते

लोहपुरुष सरदार वल्लभभाई पटेल

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here