✒️गोंडपीपरी(पुरोगामी न्युज नेटवर्क)
गोंडपीपरी(दि.14डिसेंबर):- जि प उ प्राथमिक शाळा विट्ठलवाडा येथे केंद्रस्तरीय नवरत्न स्पर्धा पार पडली. यामध्ये विट्ठलवाडा शाळेंनी प्राथमिक विभागात 8 पैकी 7 स्पर्धेत प्रथम क्रमांक प्राप्त केला तर माध्यमिक विभागात 8 पैकी 8 स्पर्धेत प्रथम क्रमांक प्राप्त केला. दरवर्षी प्रमाणे या वर्षी सुद्धा विट्ठलवाडा शाळेने केंद्रात प्रथम येण्याचा मान पटकाविला.
प्राथमिक विभागात पाहुणी नागुलवार, अंश दुर्गे, स्वरा येलेकर, आरोही कोंडावर, अंशुल गणवीर,रोहिणी अवथरे, अंश दुर्गे, अंश रामगिरकर या विद्यार्थ्यांने प्रथम क्रमांक प्राप्त केला. तसेच माध्यमिक विभागातून पूर्वा बोमनवार, पियुष फुलझेले, प्रणय वागदरकर, अंजली दिवसे, माही दुर्गे, प्रणाली दुर्गे,अक्षरा पोलोजवार, आर्यन पिंपळकर या विद्यार्थ्यांने प्रथम क्रमांक प्राप्त केला.या नवरत्न स्पर्धेत कथाकथन स्पर्धा, वादविवाद स्पर्धा, सुंदर हस्ताक्षर स्पर्धा, एकपात्री भूमिका अभिनय स्पर्धा, बुद्धिमापन स्पर्धा, स्मरणशक्ती स्पर्धा,स्वयंस्फूर्त भाषण,लेखन स्पर्धा या स्पर्धेचा समावेश होता.
बक्षीस वितरक समाधान भसारकर गटशिक्षणाधिकारी प स गोंडपीपरी, मान विलास रोहनकर केंद्रप्रमुख, नोमाजी झाडे मुख्याध्यापक विट्ठलवाडा, सोनिका देवतळे व्यवस्थापन समिती उपाअध्यक्षा विट्ठलवाडा, चांदेकर सर रालापेठ यांचे हस्ते करण्यात आले.बक्षीस वितरण कार्यक्रमाचे सूत्रसंचालन गीतांजली चौधरी मॅडम यांनी केले तर आभार विठ्ठल गोंडे सर यांनी मानले.कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी गौतम उराडे, नारायण मोरे, रविंद्र उमरे, वामन कोकुलवार, तसेच विट्ठलवाडा केंद्रातील सर्व शिक्षकांनी सहकार्य केले.