Home महाराष्ट्र चिकणीत बिनविरोध ग्रामपंचायतची परंपरा कायम

चिकणीत बिनविरोध ग्रामपंचायतची परंपरा कायम

123

🔸तालुक्यातील एकमेव ग्रामपंचायत बिनविरोध

🔹ग्रामपंचायत च्या सरपंचपदी वर्षा जांबुतकर
___________________________
✒️बळवंत मनवरक(पुसद प्रतिनिधी)
___________________________
पुसद(दि.14डिसेंबर):- तालुक्यातील चिकणी ग्रामपंचायतीत सरपंचपदी वर्षा देवानंद जांबुतकर यांची बिनविरोध निवड करण्यात आली असून एकूण सात सदस्यांपैकी चार महिला व एक पुरूष बिनविरोध निवडून आले. दोन जागा रिक्त आहेत. सन २००७ पासून मागील तिन निवडणुकांमध्ये चिकणी ग्रामपंचायतची निवडणूक बिनविरोध होत आहे. यावेळीही ही परंपरा कायम राहिली.

यंदा सरपंचपद सर्वसाधारण महिलेसाठी राखीव असल्याने वर्षा जांबुतकर या थेट जनतेतून बिनविरोध निवडून जाणाऱ्या सरपंच ठरल्या. बिनविरोध निवडून आलेल्या महिलां सदस्यां मध्ये कुंताबाई नावडे, कल्पना कल्हाणे, बेबी कुदळे, सुलक्षणा कुदळे यांचा समावेश असून विजय वैराळे एकटमेव पुरुष सदस्य आहेत.

यापूर्वी देवानंद जांबुतकर चार वेळा बिनविरोध सरपंचपदी निवडून आले होते. वयाच्या २२व्या वर्षी ते पहील्यांदा सरपंच म्हणून निवडून आले होते.यावेळी सरपंच पद सर्वसाधारण महिलेसाठी राखीव असल्याने गावातील नागरिक व महिलांच्या आग्रहाखातर देवानंद जांबुतकर यांच्या अर्धांगिणी वर्षा यांना सरपंच पदासाठी संधी देण्यात आली.

या ग्रामपंचायत मध्ये ग्रामसेवक म्हणून उषा धनवे कार्यरत आहेत. पहिल्यांदा प्रगतीत महिलांचा सहभाग असावा म्हणून महीलांना पुढे आणण्याचा विचार मांडण्यात आला. यावेळी १८ रोजी सरपंचपदासाठी त्यानुसार चार सदस्यपदी महिलांची थेट जनतेतून बिनविरोध निवड करण्यात आली.वर्षा जांबुतकर यांनी महिलांच्या बचत गट चळवळीत अग्रक्रमाने भाग घेत आहेत.

कोट:
चिकणी ग्रामपंचायतने बिनविरोध निवडणूक करून इतरांसमोर आदर्श ठेवला आहे. त्यामुळे ग्रामविकासाच्या निधीची पूर्तता शासनाने करावी, अशी अपेक्षा आहे. यापूर्वी चिकणीने स्मार्ट गाव योजनेत तालुक्यात पहिला क्रमांक पटकावला. मात्र, त्या बक्षिसाचे वितरण अद्यापही झाले. नाही. त्यामुळे नागरिकांमध्ये नाराजी आहे.
-देवानंद जांबुतकर, माजी सरपंच, चिकणी.

कोट:
“” माझे पती गेल्या चार टर्ममध्ये सरपंच होते. त्यांनी सर्वांना घेऊन चालत गावातील विकासकामांना चालना दिली. गावातील सर्वच कामांमध्ये आघाडी घेतल्याने गावकऱ्यांचा त्यांच्यावर लोभ आहे. परंतु यावेळी महिला आरक्षण असल्याने सरपंचपदाची संधी मला दिली. पतीराजांच्या पावलावर पाऊल ठेवून सर्वांच्या सहकार्याने चिकणीचा सर्वांगीण विकास हा माझा अजेंडा राहिल.

– वर्षा जांबुतकर, नवनिर्वाचित सरपंच, चिकणी…

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here