🔸अनेकांच्या उपस्थितीत तिन मिञांनी साजरा केला भव्य दिव्य सोहळा
__________________________
✒️बळवंत मनवर(पुसद प्रतिनिधी)
___________________________
पुसद(दि.14डिसेंबर):-येथील विधी व्यवसायातील प्रथितयश अँड. विवेक भैय्यासाहेब देशमुख, चाणाक्य टव्हल्स चे अविनाश गणपतराव पांडे व प्रसीद्ध व्यापारी अंजुम अब्दुल हुसेन कपाडिया या तिन मित्रांनी वर्ग १ ली मध्ये सन 1972 ला पुसद येथील नगर परिषद शाळा क्र 1 मध्ये प्रवेश घेतला व तेव्हापासून आज पर्यंत त्यांची दोस्ती अखंड आहे त्याप्रीत्यर्थ या तिघांनी मिळून जुने सोबती मित्र व गावातील प्रमुख प्रतिष्ठित मंडळींसोबत मैत्रीच्या सुवर्ण महोत्सव साजरा केला .
दि 10 नोव्हेंबर रोजी पुसद येथील हॉटेल अनुप्रभा येथे सायंकाळी 7 वा अतिशय रमणीय वातावरणात गावातील प्रमुख मान्यवरांच्या सहवासात हा अनोखा कार्यक्रम पार पडला.सुरुवातीला अँड. विवेक देशमुख यांनी प्रास्ताविक करून वर्ग 1 पासूनच्या सर्व मैत्रीच्या आठवणींना उजाळा दिला त्यानंतर प्रमुख मार्गदर्शक निवृत्त प्राचार्य उत्तम रुद्रावार यांनी संयोछोट मैत्रीवर खुसखूशीत विवेचन केले .
कार्यक्रमाचे सूत्र संचालन महागाव येथील प्रसिद्ध पत्रकार गजानन वाघमारे यांनी विविध शेरोशायरी व मैत्रीवरील चारोळ्या उद्धृत करू समर्थपणे केले.
गुलाबी थंडीत अस्सल वर्हाडी मेनू झुणका भाकर, कढी ,जळगाव वांग्याचे भरीत व गूळ पाक शिरा असा अनोखा स्वादाचा सर्व उपस्थितांनी भरपेट आनंद घेतला. या कार्यक्रमात संगीत मेजवणीही सोबतीला होती.डॉ राजेंद्र जाजू , डॉ यशवंत टेकाळे व दिग्रस येथील गायक शिक्षक रुपणार व पुसद येथील गायक बोंबले यांनी सुन्दर हिंदी गीत सादर केले.कार्यक्रमाला आ निलंय नाईक यांनी मित्र म्हणून लावलेली हजेरी कौतुकास्पद होती . तर संपर्क ठेवण्यात पुढे पुढे सरकणार्या सौ मोहिनी इंद्रनील नाईक यांनी महिला मंडळात हजेरी लावून सेल्फीचा आनंद घेतला.
पुसद अर्बन बँकेचे अध्यक्ष शरद मैंद, जिल्हा बँकेचे माजी अध्यक्ष विजय चव्हाण, न प चे माजी उपाध्यक्ष डॉ नदीम ,नगरसेवक व मित्र मंडळीची हजेरी लक्षणीय होती.गुलाबी थंडीत मैत्रीच्या 50 वर्षांची सुंदर पार्टी पुसद च्या जनमानसात सर्वत्र चर्चिल्या जात आहे.