🔹संजय मदन आडे तांडा सुधार समिती यांच्या नेतृत्वात कृषिधिकारी पुसद यांना शेकडो शेतकऱ्यांच्या उपस्थित निवेदन दिले ..!
___________________________
✒️बळवंत मनवर(पुसद प्रतिनिधी)
___________________________
पुसद(दि.13डिसेंबर):-तालुक्यातील शेकडो शेतकऱ्यांच्या तक्रारी घेऊन कृषी कार्यालयावर प्रत्यक्ष शेतकऱ्याना घेऊन न्याय मिळवुन देण्याचा प्रयत्न सुरूच राहणार या वर्षी सततच्या मुसळधार पावसामुळे शेतकऱ्यांच्या शेतातील पूर्ण पिके पाण्याखाली गेली होती तरी सुद्धा पिकाच्या झालेल्या नुकसानीच्या तुलनेत भरीव रक्क्म न देता कंपनीने शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर तटपुंजी रक्कम जमा केल्याने तांडा सुधार समितीचे तालुका अध्यक्ष यांच्यामार्गदर्शना सह शेकडो शेतकऱ्यांनी 12 डिसेंबर रोजी तालुका कृषी कार्यालय कृषी अधिकारी यांना निवेदन देऊन पीक विमा प्रश्नाबाबत पाढा वाचत प्रचंड रोष व्यक्त केला यावर्षी अतिवृष्टी मुळे पिकाचे प्रचंड नुकसान होऊनही विमा कंपनीने शेतकऱ्यांची फसवणूक केली आहे.
नुकसानिच्या तुलनेत शेतकऱ्यांना तोकडी भरपाई देऊन व अत्यल्प मदत देऊन कंपनीने चेस्टा चालू केली आहे खरिप पिकाच्या झालेल्या नुकसानीच्या तुलनेत विमा कंपनीने शेतकऱ्यांच्या खात्यावर तुटपुंजी रक्कम वितरीत केली आहे. म्हणून मा, कृषी अधिकारी बेरड साहेब यांनी अस्वस्थ केले कि पुसद तालुक्यातील सर्व शेतकऱ्यांचे विमा बाबत समस्या या 17 डिसेंबर पर्यत सोडवू अन्यथा आमी सर्व शेतकऱ्यांनी आंदोलनाचा इशारा दिला तेव्हा पुसद तालुक्यातील शेकडो शेतकरी उपस्थित होते