Home चंद्रपूर आजचे साहित्य उद्याचा इतिहास बनेल : कवी लक्ष्मण खोब्रागडे

आजचे साहित्य उद्याचा इतिहास बनेल : कवी लक्ष्मण खोब्रागडे

106

🔸झाडीबोली साहित्य मंडळाचा तिसरा वर्धापन सोहळा व ताटवा अँपचे लोकार्पण

✒️रोशन मदनकर(उप संपादक)

चंद्रपूर(दि.13डिसेंबर):-झाडीबोली साहित्य मंडळ शाखा सिंदेवाहीचा तीसरा वर्धापन दिन थाटात पार पडला . या कार्यक्रमाचे अध्यक्ष साहित्यिक तथा ज्येष्ठ चित्रकार बन्सी कोठेवार,उदघाटक कवयित्री रत्नमाला भोयर महिला अध्यक्ष झाडीबोली , विशेष अतिथी साहित्यिक डॉ. रवींद्र शेंडे उपस्थित होते . कविसंमेलनाचे अध्यक्षस्थान लक्ष्मण खोब्रागडे प्रसिद्ध झाडीकवी व अभ्यासक यांनी भूषविले .

बोललेला , लिहिलेला प्रत्येक शब्द साहित्य असून निरीक्षण व अनुभवातून साहित्याची निर्मिती होत असते . प्रत्येकांनी लिहिते होण्याची गरज आहे . आज लिहिलेला साहित्य उद्याचा इतिहास बनत असून त्यात कोणीही विकृतपणा घुसडण्याची हिंमत करणार नाहीत . तेव्हा खरा इतिहास पुढील पिढीला द्यायचा असेल तर साहित्यनिर्मितीकडे सकारात्मक दृष्टीने पाहत , वाट्याला आलेला प्रत्येक क्षण लिहिला पाहिजे .असे मत कविसंमेलनाचे अध्यक्ष लक्ष्मण खोब्रागडे यांनी व्यक्त केले .

या प्रसंगी जिल्ह्यातील प्रसिद्ध साहित्यिक व निमंत्रित कवी उपस्थिती होते ; विरेनकुमार खोब्रागडे, सुनील पोटे,अर्चना जुनघरे,प्रशांत भंडारे,संगीता बांबोळे,वृंदा पगडपल्लीवार, मधुकर दुपारे, धनंजय पोटे,आनंद बोरकर,रेश्मा बावणे,प्रमोद मडावी,पवन मोहूर्ले आदी कवींनी मानवी जीवनाचे विविध पैलू आपल्या कवितांतून उलगडले . तसेच कवी संतोष मेश्राम यांच्या ताटवा अँपचे व डॉ.रवींद्र शेंडे यांच्या विचारधारा या साहित्यकृतीचे मान्यवरांच्या हस्ते लोकार्पण करण्यात आले .

सिंदेवाही शाखेच्या तिसऱ्या वर्धापन सोहळ्याचे संचालन कवी अनिल अवसरे यांनी तर कवीसंमेलनाचे संचालन कवी संतोष मेश्राम यांनी केले . उपस्थितांचे आभार मंडळाचे सचिव बेनिराम ब्राम्हणकर यांनी मानले . कार्यक्रमाच्या यशकरिता सिंदेवाही शाखेच्या सर्व सदस्यांनी अथक परिश्रम घेतले .

कोणाला हरवून नाही तर सर्वांना सोबत घेऊन जगणारा जनसाहित्यिक : बंडोपंत बोढेकर

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here