✒️बीड प्रतिनिधी(नवनाथ आडे)मो:-9075913114
बीड(दि.11डिसेंबर):-महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या बद्दल आक्षपार्ह विधान केल्याने महाराष्ट्रातीलच नव्हे तर देशभरातील शिवप्रेमी जनतेच्या भावना दुखावल्या आहेत. राज्यपाल कोश्यारी यांना पदावरून हटवीन्याच्या मागणीसाठी 12 डीसेंबर रोजी तमाम शिवप्रेमी जनतेच्या वतीने निषेध मोर्चा काढन्यात येणार असुन बीड जिल्हा बंदची हाक सर्वपक्षीय शिवप्रेमी कडून देण्यात आली आहे. तसेच सर्वपक्षीय शिवप्रेमींनी बीड जिल्हा व्यापारी महासंघ कॅट ला ही विनंती केली आहे की आपण या बंदमध्ये सहभाग नोंदवावा त्या अनुषंगाने बीड जिल्हा बंद मध्ये शहर व बीड जिल्ह्यातील व्यापारी बांधव सहभागी होणार आहेत.
या बीड जिल्हा बंदला संभाजीनगर येथे असलेल्या चंपावती प्रतिष्ठान संभाजीनगर चा जाहीर पाठींबा प्रसिध्दीस दिलेल्या पत्रकाद्वारे दिला आहे तरी बीड जिल्हा बंद मध्ये शहर व जिल्ह्यातील जनतेने तसेच शिवप्रेमी बांधवांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे असे आवाहन चंपावती प्रतिष्ठान संभाजीनगरचे पंकज पाटेकर, प्रदिपदादा सोळंके, मा. खा.जयसिंग गायकवाड, डाॅ.एस एस पटेल, अॅड सुधीर चौधरी, सुर्यकांत कोकणे, शिवाजी झांबरे, डाॅ.राणी पवार, प्रमोद मंत्री, ओमराजे कांबीलकर, गणेश गोळेकर, चंद्रकांत मोरे, अनिल मुळे, हनुमंत सोनवणे, रामदास शेमाडे, रामदास वाघमारे, अमोल फडके, डाॅ. वसंत दाभाडे, प्रा. वसंत सानप,यांनी केले आहे