Home गडचिरोली अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषद चे डिजिटल मीडिया परिषद गडचिरोली जिल्ह्याध्यक्षपदी मनीष...

अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषद चे डिजिटल मीडिया परिषद गडचिरोली जिल्ह्याध्यक्षपदी मनीष कासर्लावार तर महासचिवपदी राजेंद्र सहारे यांची निवड

122

🔹कार्याध्यक्ष म्हणून प्रवीण चन्नावार तर उपाध्यक्ष म्हणून प्रा. संतोष सुरपाम यांची निवड

🔹जिल्हयातील सर्व तालुक्यातही अध्यक्षांची निवड

✒️रोशन मदनकर(उप संपादक)

गडचिरोली(दि.11डिसेंबर):-स्वातंत्र्याचा अगोदर पासून पत्रकारांसाठी लढणारा एकमात्र अशी संस्था असलेल्या अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषदचे डिजिटल मीडिया परिषदेचा नुकतेच कार्यकारिणी घोषित करण्यात आली . मराठी पत्रकार परिषदचे मुख्य विश्वस्त एस.एम.देशमुख, विश्वस्त किरण नाईक, अध्यक्ष शरद पाबडे , डिजिटल मिडिया चे कार्याध्यक्ष अनिल वाघमारे यांच्या मार्गदर्शनाखाली डिजिटल मीडिया परिषदेचे गडचिरोली जिल्हाध्यक्ष म्हणून विदर्भ न्यूज एक्सप्रेस चे संपादक ऍड. मनिष कासर्लावार तर जिल्हा सचिव म्हणून राईट टाईम न्यूज चे संपादक राजेंद्र सहारे ,जिल्हा कार्याध्यक्ष वृत्तवानी न्यूज चे संपादक प्रवीण चन्नावार जिल्हा उपाध्यक्ष म्हणून एस. भारत न्यूज चे संपादक प्रा. संतोष सुरपाम जिल्हा संघटक म्हणून ए . व्ही, बी. न्यूज चे संपादक अनिल बोधलकर आणि सदस्य म्हणून महाभारत न्यूज चे संपादक उदय धकाते, सत्यशोधक न्यूज २४ चे संपादक दीपक बोलीवर, लोकप्रवाह चे संपादक किशोर खेवले यांची निवड करण्यात आली.

तसेच जिल्ह्यातील सर्व तालुक्यातील तालुकाध्यक्षांची निवड करण्यात आली आहे यात आरमोरी तालुका अध्यक्ष म्हणून मिथुन धोडरे ,देसाईगंज तालुका अध्यक्ष म्हणून गौरव नागपूरकर सचिव म्हणून भुवन बोन्डे , धानोरा तालुका अध्यक्ष म्हणून दिवाकर भोयर , भामरागड तालुका अध्यक्ष म्हणून मनीष येमूलवार ,कोरची तालुका अध्यक्ष म्हणून सुरज हेमके चामोर्शी तालुका अध्यक्ष म्हणून गणेश शिंगाडे तर सचिव म्हणून संदीप जोरगलवार अहेरी तालुका अध्यक्ष म्हणून आशिष सुनतकर, एटापल्ली तालुका अध्यक्ष म्हणून मणिकंठ गादेवार मुलचेरा तालुका अध्यक्ष म्हणून आकाश तुराणकर तर सचिव गुलशन मल्लमपल्ली यांची निवड करण्यात आली

असून सदर संघटनेच्या माध्यमातून जिल्ह्यातील डिजिटल मीडियात काम करणाऱ्या जिल्ह्यातील सर्व पत्रकारांचा हितासाठी प्रयत्न करणार तसेच दिल्लीत एका डिजिटल मीडियातील प्रतिनिधीला अधिस्वीकृती मिळालेली असून त्याच धर्तीवर जिल्ह्यातील डिजिटल मीडियात काम करणाऱ्या प्रतिनिधींना अधिस्वीकृती धारण मिळविण्याकरिता प्रयत्नरथ असणार आहे आणि जिल्ह्यातील डिजिटल मीडियात काम करणाऱ्या पत्रकारांनी सदर संघटनेत सामील होऊ इच्छित असल्यास जिल्हाध्यक्षांशी संपर्क साधावा असे आवाहन करण्यात आले आहे .

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here