✒️सचिन सरतापे(प्रतिनिधी, म्हसवड)मो:-9075686100
म्हसवड(दि.11डिसेंबर):-भाजपाचे नेते व महाराष्ट्र राज्याचे शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी औरंगाबाद येथे महात्मा जोतिबा फुले, भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर, कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या बाबतीत केलेल्या बेताल वक्तव्याच्या निषेधार्थ म्हसवड येथे अनेक बहुजन संघटना,सामाजिक संघटना,बौद्ध समाजातील महिला ,पुरुष,लहान मुले मुली आणि विविध संघटनांच्या वतीने विराट मोर्चा काढून निषेध नोंदवण्यात आला.
यावेळीं मोर्चा डॉ. बाबासाहेब आंबेडकर सांस्कृतिक भवन (बुद्ध विहार) येथून सुरू झाला सिद्धनाथ मंदिर,छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे महाराजाना पुष्पहार अर्पण करून पुढे महात्मा जोतिबा फुले चौक येथे फुले यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून चंद्रकांत पाटील यांच्या विरोधात घोषणाबाजी करत मोर्चा पुढे डॉ.बाबासाहेब आंबेडकर चौक ( एस.टी. स्टँडजवळ) आला यावेळी रास्ता रोको करण्यात आला.
विविध सामाजिक संघटना आणि बहुजन संघटनाच्या वतीने म्हसवड शहरात निषेध मोर्चा आयोजित करण्यात आला होता यावेळी मोठ्या संख्येने महिला, मुले,पुरुष सहभागी झाले होते यावेळी म्हसवड पोलीस स्टेशनचे सहाययक निरीक्षक भुजबळ यांना संघटनांकडून निवेदन देण्यात आले यावेळी म्हसवडसह माण तालुक्यात अनेक सामाजिक कार्यकर्ते आले होते.
यावेळी किशोर सोनवणे म्हणाले संविधान निर्माते हे डॉ.बाबासाहेब आंबेडकर हे आहेत त्यांनी लिहिलेल्या कायद्यानुसार आम्ही वागत आहोत आंबेडकर वादी समाज हा प्रामाणिक आहे तुम्ही पण प्रामाणिक राहा तुम्ही प्रामाणिक पणा सोडला तर आम्हीपण आमचा प्रामाणिक पणा सोडू आगामी काळात कोणत्याही पक्षाच्या कोणत्याही नेत्याने महापुरुषांच्या बाबतीत अशी बेताल वक्तव्य केली तर आंबेडकर वादी समाज,बहुजन समाज शांत बसणार नाही तो तुमच्या विरोधात रस्त्यावर उतरल्याशिवाय राहणार नाही.आमच्या संयमाचा अंत पाहू नका.
यावेळी माजी जिल्हा परिषद सदस्य दिलीप तुपे,माजी नगरसेवक कुमार सरतापे, दलित पँथरचे तालुका अध्यक्ष प्रमोद लोखंडे,सामाजिक कार्यकर्ते राजाभाऊ डोबे, अजिनाथ केवटे, वंचित बहुजन आघाडीचे जिल्हा पदाधिकारी अजित साठे,प्रा.राजेंद्र माने यांनी आपल्या भाषणातून चंद्रकांत पाटील यांच्या विरोधात निषेध व्यक्त केला.
यावेळी बहुजन समाजातील कार्यकर्ते आक्रमक झालेली पाहायला मिळाली चंद्रकांत पाटील यांच्या व्यक्तव्यामुळे बौद्ध समाज आणि बहुजन समाजातील सर्वसामान्य लोकांच्या भावना दुखावल्या आहेत यापुढे आगामी काळात कोणत्याही पक्षाकडून कोणत्याही नेत्यांनी महापुरुषांच्या बाबतीत अशी बेताल वक्तव्य केली तर आम्ही शांत बसणार नाही असा निर्वाणीचा इशारा देणेत आला.