Home Breaking News सहलीसाठी विद्यार्थी घेऊन निघालेल्या स्कुल बस चा अपघात

सहलीसाठी विद्यार्थी घेऊन निघालेल्या स्कुल बस चा अपघात

372

✒️अनिल सावळे(गंगाखेड प्रतिनिधी)

गंगाखेड(दि.11डिसेंबर):-शहरातील एका शाळेच्या शालेय सहलीसाठी विद्यार्थी घेऊन जाणाऱ्या स्कूल बसचा गंगाखेड राणीसावरगाव रस्त्या जवळील ईळेगाव या परिसरात स्कुल बस व एसटी बसचा समोरासमोर अपघात झाला असून या अपघातात शालेय विद्यार्थ्यांसह २२ ते २५ जण जखमी झाले असून चौघे जण गंभीरजखमी असून या जखमींना आंबेजोगाई व परभणीच्या रुग्णालयात हलविण्यात आले आहे. उर्वरित जखमींवर गंगाखेड येथील उपजिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

याप्रकरणी अधिक माहिती अशी की, आज सकाळी दि.११ डिसेंबर रोजी शहरातील एका शाळेची शालेय सहल लातूर येथे निघाली होती. सकाळी ९ वाजताच्या दरम्यान गंगाखेड राणीसावरगाव रस्त्यावरील ईळेगाव पाटीनजीक एसटी बस व शालेय स्कूलबसचा अपघात झाला. त्यात अनेक विद्यार्थ्यांसह एसटी बसमधील प्रवाशीही जखमी झाले आहेत. दरम्यान घटनेचे वृत्त कळताच, जखमींना उपजिल्हा रुग्णालयात हलविल्यानंतर यापैकी चार गंभीर जखमींना आंबेजोगाई व परभणीच्या रुग्णालयात पुढील उपचारासाठी दाखल केले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here