✒️रोशन मदनकर(उप संपादक)
नागभिड(दि.10डिसेंबर):- तालुक्यात गिरगाव ग्रामपंचायत येथिल होऊ घातलेल्या निवडनुकी मध्ये वार्ड नं ३ मधिल वंचित चे अनु:जाती राखिव मधुन इंजी मा. विकास गोंडांने आणि सर्वसाधारण स्त्री राखिव मधुन उम्मेदवार सौ प्रियंका खोब्रागडे बिनविरोध निवडुन आले . यावेळी समाजाने एकसंघ होत पहील्यांदा बिन विरोध निवडुन आणण्याचे कार्य समाजबाधवांनी केले.
गिरगांव येथिल ग्रा.प निवडणुक क्षेत्रात नेहमीच चर्चेचा विषय राहली आहे यावेळी ग्रा प . सरपंच पदाकरीता सर्वसाधारण स्त्री राखिव असतांना सामाजिक धृविकरण लक्षात घेत व फक्त राखिव जागेच्या ठिकाणी लढण्याला झुंगारुण अनु: जातीतील उम्मेदवार उभी असल्याने चुरस निर्माण झालेली असुन अनु:जाती राखिव व सर्वसाधारण स्त्री राखिव मधुन ग्रा.प सदस्य बिनविरोध निवडुन आल्याने बळ मिळाले.
यावेळी विकास गोंडानें , प्रियंका खोब्रागडे यांनी सामाजिक , बहुजन बांधवांचे आभार मानले असुन आता सर्वसाधारण जागेवरही ताकदीने सरपंच पदाकरीता उभ्या असलेल्या अनु जातीतील उम्मेदवाराला भरगच्च मतांनी निवडुन द्यावे असे आवाहन बहुजनवादी बांधवाना केले
उमरखेड तहसीलदाराने संविधान दिन का ? साजरा केला नाही -भिम टायगर सेना