✒️धरणगाव प्रतिनिधी(पी.डी.पाटील सर)
धरणगाव(दि.10डिसेंबर):- येथील विकल्प ऑर्गनायझेशनच्या वतीने धरणगाव येथील तहसिलदार नितीनकुमार देवरे व पोलीस निरीक्षक राहुलजी खताळ यांचा शाल पुष्पगुच्छ देऊन सन्मान करण्यात आला.कार्यक्रमाचे प्रास्ताविक विकल्प ऑर्गनायझेशनचे कार्याध्यक्ष लक्ष्मणराव पाटील यांनी केले. नुकताच पालकमंत्र्यांच्या हस्ते प्रशासकीय सेवेत चांगलं काम केल्याबद्दल नितीनकुमार देवरे यांचा सन्मान करण्यात आला होता. याचे औचित्य साधून लहान माळीवाडा परिसरातील माळी समाजाचे अध्यक्ष रामकृष्ण महाजन यांच्या हस्ते नितीनकुमार देवरे यांचा शाल पुष्पगुच्छ देऊन सन्मान करण्यात आला. तद्नंतर कुणबी पाटील पंच मंडळाचे अध्यक्ष भिमराज पाटील यांच्या हस्ते धरणगाव पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक राहुलजी खताळ यांचा देखील शाल – पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला.
या कार्यक्रमात कुणबी पाटील पंच मंडळाचे उपाध्यक्ष दिलीपबापू पाटील यांच्या जन्मदिनाचे औचित्य साधून जेष्ठ पत्रकार कडू महाजन यांच्या हस्ते पुष्पगुच्छ देऊन सन्मान करण्यात आला. तिरंगा अकॅडमी चे संचालक समाधान वाघ (CISF) यांचा तसेच शालेय १९ वर्ष आतील ५५ किलो वजनी गटाच्या कुस्ती स्पर्धेत जिल्ह्यात प्रथम क्रमांक मिळविणारा विद्यार्थी ऋषिकेश गोरख महाजन तसेच ४८ किलो वजनी गटात यश संपादन केलेल्या फरान अली सय्यद या दोन्ही विद्यार्थ्यांचे आणि क्रीडाशिक्षक आकाश बिवाल या सर्वांचा तहसिलदार व पोलीस निरीक्षक यांच्या हस्ते राजमाता जिजाऊ हा ग्रंथ आणि गुलाबपुष्प देऊन सत्कार करण्यात आले.
याप्रसंगी राहुलजी खताळ व नितीनकुमार देवरे यांनी आपल्या मनोगतात सांगितले की, तरुणांनी शहरासाठी एकत्र येऊन समाजोपयोगी कार्य करावे आणि धरणगाव शहराचा नावलौकिक वाढवावा. जास्तीत जास्त तरुणांनी स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करून अधिकारी व्हावे तसेच व्यसनापासून दूर रहावे. लोकांचा सकारात्मक प्रतिसाद जर प्रशासनाला मिळाला तर लोकोपयोगी कामे करण्याची विलक्षण ऊर्जा मिळते आणि सामाजिक सलोखा टिकवता येतो, असे मत नितीनकुमार देवरे व राहुलजी खताळ यांनी व्यक्त केले.
समारोप प्रसंगी नाशिक विभागीय भ्रष्टाचार निर्मूलन समितीच्या अशासकीय सदस्यपदी लक्ष्मणराव पाटील यांची निवड करण्यात आली म्हणून तसेच प्रोटॉन शिक्षक संघटनेकडून गुणवंत शिक्षक पुरस्कार मिळाल्याबद्दल महात्मा फुले हायस्कूल चे आदर्श शिक्षक पी.डी.पाटील या दोहोंचा तहसिलदार नितीनकुमार देवरे व पोलीस निरीक्षक राहुलजी खताळ यांच्या हस्ते अनमोल ग्रंथ, शाल आणि पुष्पगुच्छ देऊन पाटील सन्मान करण्यात आला. लक्ष्मणराव पाटील यांचा त्यांच्या सर्व मित्र परिवाराने देखील सत्कार केला. उपस्थित मान्यवरांनी व मित्र परिवाराने पुढील वाटचालीसाठी सदिच्छा व्यक्त केल्या.
याप्रसंगी माजी मुख्याध्यापक एम.एच. पाटील, जेष्ठ पत्रकार कडू महाजन, गोकुळ मराठे, संजय मराठे, आबासाहेब राजेंद्र वाघ, ह.भ.प.आर.डी. महाजन, हेमंत माळी सर, गोरख देशमुख, महेश पाटील, कैलास पवार सर, समीर भाटीया, प्रा.रविंद्र मराठे, नरेंद्र पाटील, सुनिल चौधरी (सूर्या बॅटरी), अँड.संदीप पाटील, गोरख महाजन, गोरख देशमुख, सरोज भदाणे सर, दिनेश चौधरी, सतिष आप्पा, संतोष महाजन, आनंद महाजन, आनंदराज पाटील, विक्रम पाटील, दिनेश भदाणे, प्रफुल पवार, तुषार पाटील, समाधान वाघ, तेजेंद्र चौधरी, भूषण भागवत, अमोल सोनार, राज शिंपी, शुभम कंखरे, शुभम मराठे, मनिष चौधरी, जितु महाराज, राहुल पाटील, किशोर पवार सर, रुपेश सोनार, समीर तडवी, मोहित पवार, गौरव चव्हाण, योगेश येवले, राकेश पाटील यांच्यासह सर्व मित्र परिवार मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन पी.डी.पाटील यांनी तर आभार प्रा.रविंद्र मराठे यांनी मानले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी विकल्प ऑर्गनायझेशन तसेच धरणगाव शहरातील सर्व सामाजिक संघटनांचे पदाधिकारी व मित्रपरिवार यांनी परिश्रम घेतले.