Home महाराष्ट्र चंद्रकांत पाटलांच्या वक्तव्याचा काँग्रेसकडून निषेध

चंद्रकांत पाटलांच्या वक्तव्याचा काँग्रेसकडून निषेध

218

🔹इंदिरा गांधी चौकात जोडे मारून करण्यातआले निषेध आंदोलन

✒️रोशन मदनकर(उप संपादक)

गडचिरोली(दि.10डिसेंबर):- राज्याचे उच्च आणि तंत्र शिक्षण मंत्री तथा भाजप नेते चंद्रकांत पाटील यांनी एका कार्यक्रमादरम्यान महात्मा फुले, डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या विषयी वादग्रस्त वक्तव्य करत या महापुरुषांनी भीक मागून शाळा बनवल्याचे वक्तव्य केले. महापुरुषांनी लोकवर्गणीच्या माध्यमातून शाळा कॉलेज उभे केले असताना भीक म्हणून व एका अर्थाने महापुरुषांना भिकारी. म्हणन्याचा काम भाजपचे नेते चंद्रकांत पाटील यांनी केले आहे.

हा महामानवांचा अपमान असून त्याचा निषेध म्हणून अनुसूचित जाती विभाग काँग्रेस च्या वतीने गडचिरोली येथे इंदिरा गांधीजी चौकात निषेध आंदोलन करण्यात आले.

यावेळी आंदोलन करताना गडचिरोली जिल्हा काँग्रेस कमिटी अध्यक्ष महेंद्र ब्राह्मणवाडे, शहर अध्यक्ष सतीश विधाते, अनुसूचित जाती सेल अध्यक्ष रजनीकांत मोटघरे, काँग्रेस ज्येष्ठ नेते शंकरराव सालोटकर, शिक्षक सेल अध्यक्ष देवाजी सोनटक्के, ओबीसी सेल अध्यक्ष पांडुरंग घोटेकर, परिवहन सेल अध्यक्ष रुपेश टिकले, तालुका अध्यक्ष वसंत राऊत, माजी तालुका अध्यक्ष नेताजी गावतुरे, हरबाजी मोरे, चारुदत्त पोहणे, माजीद सय्यद, दत्तात्रय खरवडे, कृष्णा झंजाळ, कमलेश खोब्रागडे, जीवनदास मेश्राम, रमेश धकाते, हंसराज उराडे, भूपेश नांदणकर, सुदर्शन उंदीरवाडे, मिलिंद बारसागडे, राज डोंगरे, रुपेश सलामे, वर्षा गुलदेवकर, पोर्णिमा भडके, वंदना ढोक सह मोठ्या संख्येने काँग्रेस कार्यकर्ते पदाधिकारी आणि नागरिक यावेळी उपस्थित होते.

समृद्धी महामार्ग -जितका प्रवास तितकाच पथकर !

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here