Home महाराष्ट्र वाढदिवसाचा खर्च चालता बोलतासाठी

वाढदिवसाचा खर्च चालता बोलतासाठी

198

🔹आपल्या मुलाचा प्रथम वाढदिवस साजरा करत आहो. तर त्याच्यातील खारीचा वाटा शैक्षणिक तथा हुशार विद्यार्थ्यांना बक्षीस देऊन एक अनोखा उपक्रम समाजापुढे ठेवण्यात आला

✒️सिद्धार्थ दिवेकर(उमरखेड प्रतिनिधी)

उमरखेड(दि.10नोव्हेंबर):-दि. 10 डिसेंबर 2022 रोज शनिवारला निसर्गरम्य भव्य प्रांगणात भगवती देवी विद्यालय, देवसरी ता.उमरखेड येथे चालताबोलता चे सातवेपुष्प गुंफण्यात आले. आणि समाजसेवा व सामाजिक भान राखून बक्षिसाचे आयोजक आदरणीय श्रीमान आत्माराम लक्ष्मणराव सुरोशे नागेशवाडी मॅनेजर जिजाऊ नागरी सहकारी पतसंस्था म.उमरखेड शाखा उमरखेड आर्णि व ज्ञानप्रकाश विद्यालय, सुकळी( ज.) येथील माजी विद्यार्थी यांनी आपल्या चिरंजीवाचा प्रथम वाढदिवस अक्षद आत्माराम सुरोशे यांचा वाढदिवस12/12/2022 सोमवारी होत आहे.

त्याच्या वाढदिवसाचे औचित्य साधून तीनही बक्षीस परीक्षेचा पॅड कंपास पेटी देण्यात आली. यावेळेस चालताबोलताचे बक्षिसाचे विद्यालयातील विद्यार्थी प्रथम मानकरी युवराज कदम द्वितीय मानकरी आदित्य कदम तृतीय मानकरी अभय वानखेडे वर्ग सातवा या तिघांना मिळाले हा चालताबोलता कार्यक्रमचा प्रसार पूर्ण उमरखेड तालुक्यात झाला असून या कार्यक्रमाचे अनुकरण इतरही शाळा विद्यालय घेत आहेत याचा आम्हाला आनंद होत आहे. कारण चांगल्या कामाचे अनुकरण आपण सर्वांनी केले पाहिजे. व विद्यार्थी सामान्य ज्ञान महादीप याचा फायदा झाला पाहिजे.

या कार्यक्रमाचे संचालन अनिल अल्लडवार सर यांनी अतिशय उत्तम पद्धतीने तथा कार्यकुशलतेने त्यांनी केले आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये चढाओढ लागत आहे. या कार्यक्रमास विद्यालयाचे मुख्याध्यापक प्रल्हादराव मिरासे दिनेश वानरे राजेश सुरोसे भागवत कबले सौ. मीनाताई कदम मॅडम अरविंद चेपूरवार मारुती महाराज यांची उपस्थिती होती. समाजभिमुख कर्तव्याबद्दल आत्माराम लक्ष्मण सुरोसे यांचे मुख्याध्यापकांनी शब्दशहा तोंड भरून कौतुक केले. हे विशेष म्हणावे लागेल.

शंभराहून अधिक देशांत उपक्रम सुरू!

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here