Home महाराष्ट्र भाजप नेता चंद्रकांत पाटलांवर ऍट्रॉसिटी कायद्यानव्ये कार्यवाही व्हावी

भाजप नेता चंद्रकांत पाटलांवर ऍट्रॉसिटी कायद्यानव्ये कार्यवाही व्हावी

249

(डेमोक्रॅटिक रिपाईच्या पॅन्थर डॉ. माकणीकर यांची मागणी)

✒️मुंबई(पुरोगामी न्युज नेटवर्क)

मुंबई(दि.10डिसेंबर):-कर्मवीर भाऊराव पाटील, डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि महात्मा फुले यांनी लोकांकडे भीक मागून शाळा सुरू केल्या होत्या, असं वक्तव्य राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी केलं असून त्यांच्या वक्तव्याचा जाहीर निषेध करत मंत्री चंद्रकांत पाटलावर ऍट्रॉसिटी कायद्यांतर्गत कारवाई ची मागणी रिपब्लिकन पार्टी ऑफ (डेमोक्रॅटिक) पक्षाचे राष्ट्रीय महासचिव डॉ. राजन माकणीकर यांनी केली आहे.

विद्रोही पत्रकार डॉ. माकणीकर म्हणाले की, इतिहासाचे विडंबन करण्याचे कट कारस्थान ही भाजपा सरकार करत असून बहुजनांच्या महामानवांच्या विटंबणेचे सत्र चालवले आहे. के कृत्य निंदनीय आहे.

त्या काळात महात्मा फुले महाराष्ट्रातील सर्वात मोठे कंत्राटदार होते. ज्यावेळी टाटाची कमाई 20 हजार रु होती अश्यावेळी जोतीबांची कमाई 21 हजार रु होती होती. सर्व प्रकारच्या सुविधा असूनही त्यानी बहुजन समाजातील मूल-मुली शिकाव्या म्हणून त्यागून न करता समाज सेवेला वाहून घेतले.

ज्या कठीण काळात बाबासाहेबांनी स्वतःच्या मेहनतीवर मिलिंद कॉलेज पासून सिद्धार्थ कॉलेज ची स्थापना स्व:खर्चाने केली. अनेक देणगी दार आलेले तरी एकाचीही मदत बाबासाहेबांनी स्वीकारली नाही.

पॅन्थर डॉ. राजन माकणीकर पुढे म्हणाले की, ज्या काळात मंत्री चंद्रकांत पाटील ची मागची पिढी दुसऱ्या च्या घरी गुर- ढोर राखत असे त्या काळी महात्मा ज्योतिबा फुले व डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे उत्पन्न किती असेल याबद्दल बोलू नये.

भिका मागून जगणार्यांनी स्वतःची लायकी तपासून घेण्याचा सल्ला यावेळी माकणीकर यांनी दिला असून माफी नाही मागितल्यास मुंबईत पाऊल टाकू देणार नसल्याचा सणसणीत इशारा यावेळी त्यांनी दिला आहे

शंभराहून अधिक देशांत उपक्रम सुरू!

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here