🔹यवतमाळ येथील पोलीस भरतीपूर्व प्रशिक्षण कार्यशाळेत प्रतिपादन
___________________________
✒️बळवंत मनवर(पुसद प्रतिनिधी)
___________________________
पुसद(दि.9डिसेंबर):-यवतमाळ व महाराष्ट्रात सध्या अठरा हजार तीनशे रिक्त पदांसाठी पोलीस भरती सुरू आहे या पोलीस भरतीमध्ये अल्पसंख्याक विद्यार्थ्यांनी जास्तीत जास्त सहभाग नोंदवा यासाठी शमा सार्वजनिक संस्था आणि महाराष्ट्र पोलीस बॉईज असोसिएशन जिल्हा शाखा यवतमाळ च्या वतीने पुसद जिल्हा यवतमाळ येथील स्पर्धा परीक्षा मार्गदर्शक प्रा. सलमान सैय्यद सर यांचे मार्गदर्शक कार्यशाळेचे आयोजन गुरुवार दिनांक 8 डिसेंबर 2022 रोजी दुपारी1 वाजता एम बी खान महाविद्यालय चमेडिया ले आऊट नागपूर रोड यवतमाळ येथे करण्यात आले.
या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शमा सार्वजनिक संस्थेचे अध्यक्ष डॉ.अबरार अहमद खान होते तर प्रमुख पाहुणे म्हणून एमपीएससीच्या माध्यमातून नुकतीच पीएसआय पदावर नियुक्त झालेले इम्रान खान अयुब खान,महाराष्ट्र पोलीस बॉईज असोसिएशन चे यवतमाळ जिल्हाध्यक्ष अतीक अफजल शेख, तामीर ए उम्मत बहुउद्देशीय संस्थेचे अध्यक्ष मिर्ज़ा अतवार बेग,आयान कॅम्पुटर इन्स्टिट्यूट चे संचालक इमरान खान पठाण,स्व शेख इस्माईल बहुउद्देशीय संस्थेचे अध्यक्ष तसेच पत्रकार वासीक शेख,शमा सार्वजनिक संस्थेचे सचिव प्रा.इंजि.फुरकान अहमद खान,एम बी खान महाविद्यालयाचे
प्राध्यापक विजय भगत सर, प्रामुख्याने उपस्थित होते तसेच या कार्यक्रमांमध्ये प्रमुख अतिथी व मार्गदर्शक प्रा.सलमान सैय्यद सर,पुसद यांनी 2022 मध्ये होणाऱ्या पोलीस भरतीचा पेपर,बोर्डावर विषयानुसार फिजिकल आणि लेखी परीक्षेबाबत संपूर्ण माहिती दिली आणि आगामी पोलीस भरती साठी EWS सारखे प्रमाणपत्र बाबत संपूर्ण माहिती समजावून सांगितली.
आजच्या समाजासाठी शिक्षणाचे महत्त्व यावर प्रकाश टाकून UPSC/MPSC सारख्या सरकारी नोकऱ्यांचे महत्त्व समजावून सांगितले. तसेच या पोलीस भर्ती मध्यें कमी वेळेत उत्तीर्ण होण्यासाठी फिजिकल व लेखी परीक्षेसाठी महत्वाचे घटक विश्लेषण करून सांगितले तसेच लेखी परीक्षेत असलेले मराठी,गणित,बुद्धीमत्ता,सामान्य ज्ञान व चालू घडामोडी या विषयावर मधील येणारे महत्वाचे घटककांचे जर योग्य विश्लेषन करून अभ्यास केले तर परिक्षे पर्यन्त निश्चितच मुले योग्य मार्क घेऊन पास होतील तसेच या परीक्षेच्या कालावधी कोणत्या बाबी केल्या पाहिजे व टाळल्या पाहिजे या सर्व बाबींवर मागर्दशन केले तसेच कोणते सँदर्भ पुस्तके वाचली पाहिजे त्याची नावे सुद्धा संगीलते तसेच प्रा.सलमान सरांनी विद्यार्थ्यांना पोलिस भर्तीचा फॉर्म कोणत्या जिह्यात टाकावा टाकता वेळेस कोणत्या बाबी लक्षात घ्याव्या या बद्दल विस्तृत माहिती दिली अश्या प्रकारे प्रा.सय्यद सलमान सरांनी पोलीस भर्तीचा फॉर्म भरल्या पासून तर लेखी,फिजिकल व पार निवड होई पर्यत पूर्ण सखोल मागर्दशन केले.
अशे विस्तृत मागर्दशन पाहून विध्यार्थी सुद्धा खूप उत्साहीत झाले व सरांच्या या मागर्दशना बद्दल विध्यार्थी आपले मनोगत व्यक्त केल्या ज्या मध्ये एका मुलाने सांगितले की मला आता पर्यंत अश्या प्रकाचे विस्तृत मागर्दशन नाही मिळाले जे प्रा.सलमान सरांनी इथे मुलांना साध्या व सोप्या भाषेत सांगितले तसेच एका मुलींनी आपल्या अभिप्रायात सांगितले की आम्ही चार बहिणी आहेत आणि आमच्या घरी आमचे वडिलांची एक प्रथा होती ती अशी की जे मुली नापास होईल त्याच्या लग्न करण्यात येईल यात या अगोदर मी पोलीस भरतीची परीक्षा दिली होती परंतु काही कारणास्त त्यात मी उत्तीर्ण झाली नाही आणि माझे लग्न करण्यात आले परंतु माझे लग्न झाल्यानंतर ही मी पोलीस भरतीची परीक्षा देण्याचे ठरविले आणि 2022 मध्ये होऊ घातलेल्या पोलीस भरती परीक्षेसाठी फॉर्म भरला आणि या कार्यशाळेत आलो आणि मला या कार्यशाळेतून भरपूर ज्ञान मिळाले व आजम मला पुन्हा प्रा.सलमान सरांच्या या पूर्ण दीड तासांच्या मार्गदर्शनामुळे माझ्या मनातील नकारात्मक दूर होउन कमी वेळेत कसा चांगला अभ्यास होईन ही माहिती मिळाल्यानंतर मला सुद्धा आत्मविश्वास निर्माण झाला व मी सुद्धा पोलीस होऊ शकते ही सरांच्या मागर्दशनामुळे प्रेरणा मिळाली असे सांगत तिच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले त्याची या आत्मकथा ऐकून सर्व उपस्थित विद्यार्थी भावुक झाले आणि त्यांच्या डोळ्यातून सुद्धा अश्रू सुधरेनासे झाले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आणि आभार प्रदर्शन महादेव कांबळे सर यांनी केले या कार्यक्रमास यवतमाळच्या पोलीस भरती / MPSC ची तयारी करणारे युवक आणि पोलीस बॉईज असोसिएशन चे कार्यकर्ते शारीक शेख (शहर उपाध्यक्ष),सोहेल काझी (जिल्हा प्रसिद्ध) फैसल शेख (सदस्य) तसेच एम बी खान महाविद्यालयाच्या प्रा. कू.गुलनाझ शेख, प्रा. कू. श्वेता हेडावू.बि के पठाण, कू. दुर्गा निमकर, पी एन जीवने, सुमित फातकर,अयुब पठाण, तारिक अजीज, अब्दुल जावेद, शेख इर्शाद आदी कर्मचारी व पत्रकार वासिक शेख उपस्थित होते.अशी यशस्वी पोलीस भरती कार्यशाळा यवतमाळ मध्ये संपन्न झाली.प्रा.सलमान सैय्यद सरांचे संपूर्ण महाराष्ट्रात अल्पसंख्याक विद्यार्थ्यांसाठी पोलीस भरतीबाबत जनजागृती करण्यासाठी विविध ठिकाणी निशुल्क कार्यक्रम सुरू आहेत सर चे हे विचार आहे की जर कोणतही विद्यार्थी सरांच्या मागर्दशनामुळे पोलीस बनला तर त्यांच्या कुटूंबाची स्थिती सुधारेल व तो पुढे कोणालाही मदत करू शकेल तर यातच माझं समाधान आहे. सरांच्या या पोलीस भर्ती सेमिनारमुळे सर्व समाजाच्या 4 हजार पेक्षा अधिक मुलांनी पोलीस भर्तीचे सेमिनार बघून फॉर्म भरले व पोलीस भर्तीच्या तयारीला लागले आहे.व सरांच्या सन्मपर्कात आहे .
प्रा.सय्यद सलमान सर ज्या ठिकाणी कार्यक्रम करतात त्या नन्तर त्या ठिकाच्या विद्यार्थ्यांना ऑनलाइन मोफत मागर्दशन करतात त्यामुळे विद्यार्थ्यांना फक्त सेमिनार घेऊन संपत नाही तर पूर्ण लेखी परीक्षेसाठी ऑनलाइन मोफ़त मागर्दशन करतात विद्यार्थ्यांनी अधिक माहितीसाठी त्यांचे व्हाट्सअप नंबर 9158949409 या क्रमांकावर संपर्क साधावे तसेच कोणत्याही समाजाच्या संघटनेला जर पोलिस भर्तीचे सेमिनार त्याच्या ठिकाणी ठेवायची असेल तर रविवारी सेमिनार ठेऊ शकता तेथे प्रा.सलमान सर मोफत मार्गदर्शन असे आवाहन प्रा. सलमान सैय्यद सरांनी केले.अश्या प्रकारचे समाजाच्या शैक्षणिक जनजागृतीचे कार्य प्रा.सय्यद सलमान सर करत आहे.ही आपल्या यवतमाळ जिल्ह्यासाठी एक अभिमानाची बाब आहे.व सरांचा या कार्याचे कौतुक सर्वी कडून होत आहे