Home बीड चौथ्या मजल्यावरून पडून चिमुकलीचा दुर्देवी मृत्यू

चौथ्या मजल्यावरून पडून चिमुकलीचा दुर्देवी मृत्यू

401

🔹बीड शहरातील खळबळजनक घटना

✒️बीड प्रतिनिधी(नवनाथ आडे)मो:-9075913114

बीड(दि.9डिसेंबर):;शहरात इमारतीच्या चौथ्या मजल्यावरून पडून दीड वर्षाच्या चिमुकलीचा दुर्देवी मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. दरक्शा रईसोद्दीन कुरेशी असे या मयत चिमुकलीचे नाव आहे. दरक्शा खेळता खेळता इमारतीच्या चौथ्या मजल्यावरून पडली. बीडच्या झमझम कॉलनी येथे रईसोद्दीन कुरेशी यांची मुलगी दरक्शा इमारतीच्या चौथ्या मजल्यावरून खेळता खेळता पडली आणि तिचा मृत्यू झाला.

बीड पोलिसांनी आकस्मिक मृत्यू म्हणून तिची नोंद केली आहे.
रईसोद्दीन कुरेशी हे झमझम कॉलोनीत भाड्याने राहतात. सकाळी साडेनऊच्या सुमारास दरक्शा खेळताना तिचा तोल गेल्याने ती चौथ्या मजल्यावरून खाली पडली आणि तिचा मृत्यू झाला. या घटनेमुळे सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here