Home महाराष्ट्र राष्ट्रीय सरपंच संसद च्या नागपुर विभाग समन्वयकपदी संजय गजपुरे यांची नियुक्ती …

राष्ट्रीय सरपंच संसद च्या नागपुर विभाग समन्वयकपदी संजय गजपुरे यांची नियुक्ती …

207

🔹केंद्रीय आरोग्य व महिला बालकल्याण राज्यमंत्री डॅा. भारतीताई पवार यांच्या हस्ते नियुक्तीपत्र प्रदान

✒️रोशन मदनकर(उप संपादक)

चंद्रपूर(दि.9डिसेंबर):-पुणे येथील एमआयटी विश्वशांती विद्यापीठात पार पडलेल्या राष्ट्रीय सरपंच संसदेच्या दोन दिवसीय अधिवेशनात नागपुर विभाग समन्वयकपदी चंद्रपुर जिल्ह्यातील संजय होमराज गजपुरे यांच्या नियुक्तीची घोषणा करण्यात आली .

संजय गजपुरे हे चंद्रपुर जिल्ह्यातील सामाजिक व राजकीय क्षेत्रात काम करणारे युवा नेतृत्व असुन त्यांच्यातील संघटन कौशल्य व सामाजिक कार्याची दखल घेऊन त्यांच्याकडे राष्ट्रीय सरपंच संसदेच्या नागपुर विभागीय समन्वयक पदाची जबाबदारी सोपविण्यात आली आहे. यापुर्वी ते चंद्रपुर जिल्हा समन्वयक म्हणुन काम पाहत होते. या माध्यमातुन शासनाच्या नाविण्यपुर्ण व लोकोपयोगी विविध योजना ग्रामवासीयांपर्यंत पोहचविण्याचा निर्धार संजय गजपुरे यांनी व्यक्त केला आहे.

राष्ट्रीय सरपंच संसदेच्या पुणे येथे संपन्न दोन दिवसीय अधिवेशनात एमआयटी विश्वशांती विद्यापीठाचे कार्यकारी अध्यक्ष राहुल कराड व राष्ट्रीय सरपंच संसदेचे मुख्य समन्वयक योगेश पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत केंद्रीय आरोग्य व कुटुंब कल्याण राज्यमंत्री जमा. भारतीताई पवार यांच्या हस्ते संजय गजपुरे यांना नियुक्तीपत्र देण्यात आले तसेच सन्मानचिन्ह व शाल देऊन सत्कार करण्यात आला. याप्रसंगी राज्याचे वने, सांस्कृतिक कार्य तथा मत्स्यव्यवसाय मंत्री नाम. सुधीरभाऊ मुनगंटीवार हे ॲानलाईन व्हिडिओ कॅान्फरन्सिंग द्वारे उपस्थित होते.

या अधिवेशनात राष्ट्रीय सरपंच संसदेच्या वतीने राज्यातील सर्वच तालुक्यातील प्रत्येकी एक गाव दत्तक घेण्यात येऊन आदर्श गाव करण्याचा संकल्प करीत असल्याची घोषणा करण्यात आली . दत्तक घेतलेल्या गावाच्या विकास आराखडाच्या माध्यमातुन विकासाच्या विविध योजना राबविल्या जाणार आहेत . यासाठी एमआयटी व राष्ट्रीय सरपंच संसदेच्या वतीने विविध संस्था , उद्योगपती यांच्याशी सीएसआर फंड बाबत संपर्क करण्यात येत असल्याचीही माहिती देण्यात आली . यासोबतच जिल्ह्यातील सर्व सरपंचांना एकत्रित करुन त्यांच्या अडीअडचणी शासनस्तरावरुन सोडविण्यासाठी सरपंच संसदेद्वारा निश्चित प्रयत्न करण्याचा संकल्प याप्रसंगी उपस्थित सर्वच पदाधिकाऱ्यांनी केला. यासाठी लवकरच जिल्हास्तरावर सरपंच मेळावे घेण्याचे नियोजन करण्यात आले.

याप्रसंगी राज्य समन्वयक प्रकाश महल्ले , कार्यवाहक व्यंकटेश जोशी , अभिनव फार्मर्सचे संस्थापक ज्ञानेश्वर बोकडे , जिंदाल स्टीलचे सीएसआर विभाग प्रमुख अनिल दधीच , राज्य संघटक नामदेव गुंजाळ , ग्रामविकास समिती प्रमुख बाजीराव खैरनार यांच्यासह महाराष्ट्र राज्यातील ३४ जिल्ह्यातील राज्य पदाधिकारी , जिल्हा अध्यक्ष व जिल्हा समन्वयक उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here