Home गडचिरोली देशाच्या एकात्मतेसाठी आणि संविधानाच्या रक्षणासाठी सर्वांनी एकत्र या… महेंद्र ब्राम्हणवाडे

देशाच्या एकात्मतेसाठी आणि संविधानाच्या रक्षणासाठी सर्वांनी एकत्र या… महेंद्र ब्राम्हणवाडे

162

✒️रोशन मदनकर(उप संपादक)

गडचिरोली(दि.9डिसेंबर):-मागील 8 वर्षांपासून देशातील वातावरण दूषित झाला असून सर्वत्र धार्मिक आणि जातीय तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न चालू आहे. धर्मग्रंथ माणसाला जगण्याची दिशा तर संविधान जगण्याचे अधिकार देते मात्र नरेंद्र मोदी च्या नेतृत्वातील भाजप सरकार एकीकडे धर्मा- धर्मात वाद घालतात तर दुसरीकडे संविधान तोडण्याचा प्रयत्न करत आहे त्यामुळे आपन सर्वांनी बायबल, भगवत गीता, कुराण यांचा आदर्श ठेवून प्रेम आणि ऐकतेचा संदेश दिला पाहिजे आणि संविधानाच्या रक्षणाकरिता एकत्र आले पाहिजे असे प्रतिपादन गडचिरोली जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष महेंद्र ब्राम्हणवाडे यांनी केले.

ख्रिसमस निमित्त सुमानंद सभागृ गडचिरोली येते आयोजित सांस्कृतिक महोत्सवात ते बोलत होते. यावेळी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस सचिव विजय नळे, महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेस महासचिव शिवानी वडेट्टीवार, शहर काँग्रेस अध्यक्ष सतीश विधाते, पर्यावरण सेल अध्यक्ष राजेश ठाकूर, परिवहन सेल अध्यक्ष रुपेश टिकले सह मोठ्या संख्येने महिला, युवक, नागरिक उपस्थित होते.

राजकारण धर्मावर असावे की समस्येवर?

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here