🔹सत्यशोधक समाज संघाचा प्रेरणादायी उपक्रम!….
✒️विशेष प्रतिनिधी(पी.डी.पाटील सर)
धरणगांव(दि.9डिसेंबर):- शहरातील महात्मा फुले हायस्कूल येथे सत्यशोधक समाज संघ आयोजित रंगभरण व हस्ताक्षर स्पर्धा घेण्यात आल्या. कार्यक्रमाचे प्रास्ताविक व्ही.टी.माळी यांनी केले.कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शाळेचे मुख्याध्यापक जे.एस.पवार होते. येत्या ११ डिसेंबर, २०२२ रविवार रोजी सत्यशोधक समाज संघाचे जिल्हा अधिवेशन कुऱ्हे पानाचे ता.भुसावळ येथे होणार आहे.
सत्यशोधक समाज संघ जिल्हा समन्वय समितीचे प्रमुख पी.डी. पाटील, भारतरत्न डॉ.ए पी जे अब्दुल कलाम पुस्तक भिश्शीचे संस्थापक अध्यक्ष विजय लुल्हे, एच.डी.माळी, आबासाहेब राजेंद्र वाघ, लक्ष्मणराव पाटील यांच्या संकल्पनेतुन राष्ट्रपिता महात्मा जोतीराव फुले यांचे कार्य घराघरापर्यंत पोहचायला हवे यासाठी रंगभरण व सुंदर हस्ताक्षर स्पर्धाचे आयोजन करण्यात आले होते.
शाळेतील सर्वच मुलांनी उत्साहाने रंगभरण व सुंदर हस्ताक्षर स्पर्धेत सहभाग भाग घेतला. रंगभरण स्पर्धेत – प्रथम, द्वितीय , तृतीय ,सुंदर हस्ताक्षर स्पर्धेत प्रथम , द्वितीय , तृतीय . सर्व विजेत्या विद्यार्थ्यांना शाळेकडून ग्रंथ व लेखणी भेट देण्यात आली.याप्रसंगी शाळेचे मुख्याध्यापक जे एस पवार, पर्यवेक्षक एम बी मोरे, सर्व शिक्षक बंधू भगिनी व कर्मचारी वृंद उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचलन पी.डी.पाटील व आभार एस.एन.कोळी यांनी मानले