असंघटीत कामगारांच्या सन्मानासाठी स्वतंत्र मजदूर युनियन मैदान उतरली आहे.महाराष्ट्र राज्यात कामगारांच्या प्रश्नावर कामकाज करणा-या बारा राष्ट्रीय ट्रेड युनियन आणि त्यांच्या हजारो संलग्न संघटना, युनियन कार्यरत असताना देखील स्वतंत्र मजदूर युनियनचे राष्ट्रीय अध्यक्ष आदरणीय जे. एस. पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली “स्वतंत्र म्युनिसिपल कामगार युनियन” ची स्थापना करण्यात आली आहे.तेव्हा पासून राज्यातील महानगरपालिका, नगरपालिका, नगरपरिषद, नगरपंचायत संघटीत असंघटीत कंत्राटी कामगारांना संघटीत करण्यासाठी प्रयत्नशील असून शासन प्रशासनाशी सनदशीर पद्धतीने पत्रव्यवहार करीत आहे. देशात राज्यात ३६५ दिवस चोवीसतास साती दिवस स्वच्छता राखण्याचे काम करणारे कामगार ठेकेदारी, कंत्राटी पद्धतीने का ठेवल्या जातात. कायम स्वरूपी कामे करणारे कंत्राटी कामगार कसे?.हा प्रश्न बारा राष्ट्रीय ट्रेड युनियनच्या उच्चवर्णीय नेतृत्वाला पडणार नाही. पण भारतीय संविधान मान्य असणाऱ्या उच्चशिक्षित प्रशासकीय अधिकारी वर्गाला आणि न्याय पालिकेला का पडत नाही. देशातील सर्व महानगरपालिका मध्ये काम करणारा कामगार हा मागासवर्गीय असल्यामुळे त्यांना समान न्याय अधिकार मिळणार नाही. याची दक्षता घेतली जाते असे आमच्या निदर्शनात आले आहे.
स्वतंत्र म्युनिसिपल कामगार युनियनची स्थापना होण्याच्या अगोदर महाराष्ट्र राज्यातील विविध महापालिका, नगरपालिका, नगरपरिषद आणि नगरपंचायत मध्ये कार्यरत असलेल्या जास्तीतजास्त किंबहुना सर्वंच संघटना राजकीय पक्षांच्या आणि सामाजिक संस्थांमधील नेत्यांच्या माध्यमातून चालविण्यात येत आहेत. परंतु ‘भारतीय ट्रेड युनियन ॲक्ट १९२६’ मधील तरतुदीनुसार कर्मचारी, कामगार यांच्या नेतृत्वाखाली कार्यरत असलेली एकही कामगार संघटना देशात महाराष्ट्रात निदर्शनास आलेली नाही. त्यामुळे देशपातळीवर शाहू,फुले,आंबेडकर ह्या विचारधारेवर कार्यरत असलेली ‘स्वतंत्र मजदूर युनियन’ ह्या कामगार संघटनेच्या सहकार्याने महाराष्ट्र राज्यातील महापालिका, नगरपालिका, नगरपरिषद आणि नगरपंचायत मध्ये शाहू, फुले, आंबेडकर ह्या महापुरुषांच्या विचारांवर विश्वास ठेवून स्वतःच्या कार्यक्षेत्रात कार्यरत असलेल्या कर्मचारी, कामगार, अधिकारी यांना एकत्रित करून दि.१६ नोव्हेंबर २०१८ रोजी “स्वतंत्र म्युनिसिपल कामगार युनियन” नावाच्या कामगार संघटनेला ‘भारतीय ट्रेड युनियन ॲक्ट १९२६’ नुसार महाराष्ट्र शासनाच्या कामगार विभागामार्फत नोंदणीकृत करण्यात आले.
सदरहू संघटनेच्या माध्यमातून सन २०१८ पासून महाराष्ट्रातील नगरपरिषद, नगरपालिका, नगरपंचायत आणि महापालिका मध्ये शाखा, उपशाखा सुरू करण्यात आल्या आणि त्या सर्व शाखांचे नेतृत्व त्या ठिकाणी कार्यरत असलेल्या कामगार, कर्मचारी आणि अधिकारी यांच्याकडे सोपविण्यात आले. स्वतंत्र म्युनिसिपल कामगार युनियनच्या माध्यमातून गेल्या ३ वर्षांत सफाई कामगारांच्या अनेक प्रश्नांना वाचा फोडण्याचे काम करण्यात आल्यामुळे अनेक प्रश्न मार्गी लावण्यात संघटनेला यश मिळाले आहे.
स्वतंत्र म्युनिसिपल कामगार युनियनच्या वतीने प्रशासनाकडे विविध प्रश्नांवर पत्रव्यवहारा करण्यासोबतच कर्मचारी, कामगार वर्गामध्ये प्रशासकीय, सामाजिक, शैक्षणिक आणि आरोग्य या विषयावर जागृती निर्माण करण्याचे प्रयत्न संघटनेच्या माध्यमातून केले जात आहेत. महाराष्ट्र राज्यातील महापालिका, नगरपालिका, नगरपरिषद आणि नगरपंचायत मध्ये शाहू, फुले, आंबेडकर ह्या महापुरुषांच्या विचारांवर विश्वास असलेल्या कामगार, कर्मचारी, अधिकारी यांनी स्वतंत्र म्युनिसिपल कामगार युनियनचे सभासदत्व स्विकारले पाहिजे.तरच देशात राज्यात ३६५ दिवस चोवीसतास साती दिवस स्वच्छता राखण्याचे काम करणारे कामगार ठेकेदारी, कंत्राटी पद्धतीने का ठेवल्या जातात. कायम स्वरूपी कामे करणारे कंत्राटी कामगार कसे? ही गंभीर समस्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी दिलेलेया सनदशीर मार्गाने सोडवता येईल.याची आम्हाला खात्री झाली आहे. म्हणूनच या कामगारांनी उच्चवर्णीय वर्गीय राजकीय आर्थिक हितसंबंध असलेल्या युनियन पासून वेगळे होऊन स्वताच्या युनियन मध्ये सहभागी झाले पाहिजे.
स्वतंत्र म्युनिसिपल कामगार युनियनचा बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या परिपत्रकानुसार आणि संघटनेच्या नियमावली नुसार पत्रव्यवहार केला जातो. वार्षिक वर्गणी रूपये २५०/ व्यतिरिक्त कोणत्याही प्रकारची वर्गणी किंवा देणगी वेतनातून कपात केली जात नाही. कोणत्याही प्रकारचे कामगार, कर्मचाऱ्यांशी संबंधित प्रश्न सोडविताना कामगार, कर्मचाऱ्यांना सोबत घेऊन प्रशासना सोबत बैठका घेतल्या जातात. त्यासाठी कामगार,कर्मचारी प्रशिक्षित केला जातो. सभासदांकडून घेतली जाणारी वर्गणी सभासदांच्या कल्याणासाठी वापरली जाणार. सभासदांच्या वारसदारांना शैक्षणिक मार्गदर्शन उपलब्ध करून दिले जाणार. जुनी पेन्शन योजना नवीन कर्मचाऱ्यांना लागू करण्यासाठी स्वतंत्र मजदुर युनियन ह्या राष्ट्रीय स्तरावरील संघटनेच्या माध्यमातून सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली आहे.स्वतंत्र मजदुर युनियन शी संलग्न संघटना शासनाच्या माध्यमातून सुरू असलेल्या कंत्राटी करणाच्या विरोधात विधानसभेच्या हिवाळी अधिवेशनावर आदरणीय जे. एस. पाटील यांच्या नेतृत्वाखाली प्रचंड मोर्चा २१ डिसेंबर २०२२ रोजी दुपारी १२ वाजता, यशवंत स्टेडीयम नागपूर आयोजित करण्यात आला आहे.
त्यासाठी कामगारांनी मोठ्या संख्येने मोर्चात सहभागी व्हावे.कारण संख्येच्या बळावर लढाई लढता येते आणि जिंकता येते. वरील सर्व प्रश्नांना मार्गी लावण्यासाठी आणि देशपातळीवर शाहू, फुले, आंबेडकर विचारधारेची स्वतंत्र मजदूर युनियन ही राष्ट्रीय कामगार संघटना मान्यता प्राप्त करण्यासाठी महापालिकापालिका, नगरपालिका, नगरपरिषद आणि नगरपंचायत कामगार, कर्मचारी, अधिकारी यांनी मोठ्या संख्येने २१ डिसेंबर २०२२ रोजी दुपारी १२ वाजता,यशवंत स्टेडीयम नागपूर येथे प्रंचड मोर्चात सहभागी व्हावे असे स्वतंत्र म्युनिशिपल कामगार युनियनच्या वतीने जाहीर आवाहन करण्यात येत आहे.
✒️निलेश नांदवडेकर(कार्यालयीन सचिव,स्वतंत्र म्युनिसिपल कामगार युनियन, महाराष्ट्र राज्य कमिटी)मो:-९३२१८४७८३८