Home महाराष्ट्र डॉ.बाबासाहेब आंबेडकर महापरिनिर्वाण दिनी वंदन

डॉ.बाबासाहेब आंबेडकर महापरिनिर्वाण दिनी वंदन

94

🔸कॅन्डल रॅली काढून अभिवादन
___________________________
✒️बळवंत मनवर(पुसद प्रतिनिधी)
___________________________
पुसद(दि.8डिसेंबर):-काकडदाती येथील पुलाते ले आऊटमध्ये डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिन आदरांजली वाहून अभिवादन करण्यात आले.

महापरिनिर्वाण दिनानिमित्त प्रथम सकाळी पुलाते ले आऊट येथील ज्येष्ठ मंडळी यांच्या हस्ते तथागत भगवान गौतम बुद्ध व डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन करून त्रिशरण पंचशील ग्रहण करण्यात आले. त्यानंतर रमा संतोष कांबळे या छोट्याशा मुलीने अतिशय सुंदर रित्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे विचार मांडून त्यांना आदरांजली वाहिली.त्यानंतर सायंकाळी पुलाते ले आऊट पासून वर्षा नगर,गोविंद नगर, भीम नगर येथून कॅण्डल रॅली काढण्यात आली.

रॅलीने संपूर्ण परिसर बुद्धम् शरणम् गच्छामि,धम्मम शरणं गच्छामि, संगम शरणम् गच्छामि,या स्वराने संपूर्ण परिसर भावुक होऊन बाबासाहेबांना आदरांजली वाहत होता. यावेळी कार्यक्रमाला पांडुरंग मनवर, प्रकाश खंडागळे, विनोद इंगोले, मनोज गवई, संघपाल अडोळे, गौतम कोकने, भगत सर,यशवंत पाईकराव, मिलिंद कांबळे, किरण धुळे, आकाश कोल्हे, धीरज कांबळे, रमेश थोरात, संजय शेजुळे, संतोष कांबळे, बबन खंदारे, संभाजी इंगोले, किसन इंगोले, विश्वास कांबळे त्याचबरोबर महिला मंडळ मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here