🔹मनसेचे उपविभागीय पोलीस अधिकारी यांना निवेदन
✒️सिद्धार्थ दिवेकर(उमरखेड प्रतिनिधी)
उमरखेड(दि. 8 डिसेंबर):-शहरातील शाळा व महाविद्यालय परिसरात गैर विद्यार्थी तथा रोडरोमियोचा विनाकारण सुळसुळाट दिसून येत असल्याने विद्यार्थ्यांमध्ये आक्रोश व भीती निर्माण झाली आहे.
करिता पोलीस प्रशासनाने या रोडरोमियोवर कायदेशीर तात्काळ कारवाई करण्याकरिता दि. 7 डिसेंबर रोजी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने उपविभागीय पोलीस अधिकारी यांना निवेदन दिले.
शहरातील पुसद रोड येथील शाळा व ढाणकी रोड गो .सी गावंडे महाविद्यालय परिसरात गैर विद्यार्थी टवाळखोर चिडीमारी करणाऱ्या रोडरोमियोंच्या संख्येत वाढ झाल्याने शालेय व महाविद्यालयीन विद्यार्थिनींना भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे त्यांच्या मनात आक्रोश दिसून येत आहे त्यामुळे पोलीस प्रशासनाने दामिनी पथक चे अधिकारी व कर्मचारी यांना या गांभीर्य विषयी विशेष लक्ष देऊन भविष्यात काही विद्यार्थिनी सोबत अपरिहार्य घटना घडू नये त्यासाठी पोलीस प्रशासनाने योग्य पाऊल उचलून शालेय विद्यार्थिनींना न्याय देण्याचे काम करावे करिता महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीनेनिवेदन देण्यात आले.
शहरातील काही शाळेजवळ व महाविद्यालयाजवळ पानटपरी वर, चौफुली जवळ , हॉटेलवर विनाकारण रोडरोमिओ सतत धुमाकूळ घालत असतात व येणाऱ्या जाणाऱ्या महाविद्यालयीन विद्यार्थिनींची छेड काढत असतात त्यासाठी पोलीस प्रशासनाने दामिनी पथकाला अग्रेसर भूमिका घेऊन शहरात धुमाकूळ घातलेल्या रोड रोमिओन वरती कडक कारवाई करून शालेय विद्यार्थिनींच्या मनात भीती निर्माण होणार नाही यासाठी पोलीस प्रशासनाने गांभीर्य विषयी कायदेशीर कारवाई करण्यात यावी.
अन्यथा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतर्फे मनसे स्टाईलने रोडरोमियोंची व्यवस्था लावण्यात येईल असा इशारा देण्यात आला यावेळी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे जिल्हा उपाध्यक्ष डेविड शहाणे, शहर अध्यक्ष संजय बिजोरे पाटील ,संदीप कोकाटे, मनोज कदम ,अमोल लामटिळे, सचिन शेरे, तालुका अध्यक्ष मनवीसे प्रवीण कनवाळे, आकाश ओझलवार, आदर्श राऊत, रवी कदम आदी मनसे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.