🔸दोन्ही तरूण पोलीस कर्मचाऱ्यांचे सुपुत्र
✒️बळवंत मनवर(पुसद प्रतिनिधी)
पुसद(दि.6डिसेंबर):-शहरातील ज्ञानेश्वर नगर येथे शाळकरी विद्यार्थ्यावर चार तरुणांकडून दि.५डिसेंबर २०२२ रोजीच्या संध्याकाळी ६.३० वाजताच्या दरम्यान चाकूने जीवघेणे हल्ला चढविला आहे. हल्ल्यात शाळकरी विद्यार्थी गंभीर जखमी झाला असून त्याला नागपूर येथे अधिक उपचाराकरिता दाखल केले आहे. हल्ला करणाऱ्या तरुणा विरोधात शहर पोलीस स्टेशनमध्ये दि.५ डिसेंबर २०२२ रोजीच्या रात्री ११.५ वाजता विविध कलमाने गुन्हे दाखल करण्यात आला आहे. या हल्ल्यात गंभीर तरुण व हल्ला करणारा तरुण दोघेही पोलीस कर्मचाऱ्यांचे सुपुत्र असल्याची प्राथमिक माहिती मिळाली आहे.
अनिकेत विजय पवार वय १९ वर्षे रा. ज्ञानेश्वर नगर असे जखमी झालेल्या तरुणाचे नाव आहे. तर चाकूने जीवघेणी हल्ला केल्या प्रकरणी जखमीचे वडील विजय ठाकूरसिंह पवार वय ४३ वर्षे रा.ज्ञानेश्वर नगर यांनी शहर पोलिस ठाण्यात तक्रार दिली असता ऋतिक अनिल कांबळे वय २० वर्षे रा.लक्ष्मीनगर व त्याच्या तीन साथीदारा विरोधात विविध कलमाने गुन्हे दाखल करण्यात आले आहे. शहर पोलीस स्टेशनच्या सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार अनिकेत हा दि.५ डिसेंबर रोजी च्या संध्याकाळी ६.३० वाजताच्या दरम्यान एका कोचिंग क्लासेस मधून टिव्हेशन क्लास संपवून घरी जात असतांना अशावेळी काही अंतरावरील ज्ञानेश्वर नगर येथे ऋतीक व त्याच्या तीन साथीदाराने संगणमत एका मुलीच्या प्रेम प्रकरणातून वाद निर्माण केला अशी प्राथमिक माहिती समोर आली आहे.
त्यानंतर ऋतिकने त्याच्याजवळ चाकू काढून अनिकेतवर जीवाने ठार मारण्याच्या उद्देशाने पाठीवर व छातीवर सपासप सात वार करून गंभीर जखमी केले. जखमी अनिकेतला जखमी केल्याची माहिती आजूबाजूच्या लोकांना कळाली असता जवळच असलेल्या डॉ. मालपाणी यांच्या दवाखान्यांमध्ये प्राथमिक उपचाराकरिता दाखल केले.परंतु प्रकृती चिंताजनक असल्यामुळे त्याला मेडिकेअर मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल मध्ये दाखल केले.त्यानंतरही प्रकृतीत सुधारणा न झाल्याने त्याला नागपूर येथे अधिक उपचाराकरीता दाखल केले आहे. तेथील उपस्थित डॉक्टरांनी प्रकृती स्थिर असल्याची प्राथमिक माहिती पोलीस सूत्रांकडून मिळाली आहे.शिक्षण घेण्याच्या वयामध्ये प्रेम प्रकरणातून पोलिसाच्या मुलाने दुसऱ्या पोलीसाच्या मुलाचा काटा काढण्यासाठी चाकू हल्ल्या केल्याने पोलीस वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे. वृत्त लिहोस्तर ऋतिकच्या तीन साथीदाराचा शोध शहर पोलीस स्टेशन कडून घेतल्या जात आहे.