Home महाराष्ट्र धरणगांव येथे सत्यशोधक समाज संघाची बैठक उत्साहात संपन्न !….

धरणगांव येथे सत्यशोधक समाज संघाची बैठक उत्साहात संपन्न !….

148

🔹शिवराय,फुले,शाहू, आंबेडकर यांचे विचारच आपल्याला तारतील – सत्यशोधक अरविंद खैरनार

🔸पी.डी.पाटील व लक्ष्मणराव पाटील यांचा माळी व पाटील समाज पंचमंडळाकडून सत्कार

✒️धरणगाव प्रतिनिधी(पी.डी.पाटील सर)

धरणगांव(दि.6डिसेंबर):- शहरातील लहान माळीवाडा येथे माळी समाज मढी मध्ये सत्यशोधक समाज संघाची बैठक उत्साहात संपन्न झाली. या बैठकीचे प्रास्ताविक पी डी पाटील सर यांनी केले.
या बैठकीच्या अध्यक्षस्थानी माळी समाज पंचमंडळाचे अध्यक्ष रामकृष्ण महाजन होते. प्रमुख अतिथी म्हणून सत्यशोधक समाज संघाचे संस्थापक अध्यक्ष अरविंद खैरनार, जिल्हा समन्वय समिती सदस्य विजय लुल्हे , शिवदास महाजन, कविराज पाटील होते. मान्यवरांच्या हस्ते राष्ट्रपिता महात्मा ज्योतिराव फुले यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले.

आलेल्या सर्व मान्यवरांचे माळी व पाटील समाज पंचमंडळाकडून ग्रंथ व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. सत्यशोधक अरविंद खैरनार यांनी ११ डिसेंबर कुऱ्हे पानाचे येथे सत्यशोधक परिषद व अधिवेशन होणार आहे या संदर्भात विस्तृत असे मार्गदर्शन करून ११ डिसेंबरला सर्व धरणगावकरांनी जास्तीत जास्त संख्येने उपस्थिती द्यावी अशी आशा व्यक्त केली. महापुरुषांचे कार्य प्रेरणादायी आहे आणि ते कार्य आणि पुढील सुरू ठेवणार आहोत असे प्रतिपादन विजय लुल्हे यांनी केले.

याप्रसंगी माळी व पाटील समाज पंचमंडळाकडून पी.डी.पाटील व लक्ष्मणराव पाटील यांना जिल्हास्तरीय सत्यशोधक महात्मा ज्योतिराव फुले गुणवंत आदर्श शिक्षक पुरस्कार मिळाल्याबद्दल पुष्पगुच्छ देऊन मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.

याप्रसंगी पाटील समाजाचे अध्यक्ष भीमराज पाटील, माळी समाजाचे उपाध्यक्ष शिवाजी देशमुख, कोषाध्यक्ष राजेंद्र महाजन, ज्येष्ठ पत्रकार कडू महाजन, माजी मुख्या.एस.डब्ल्यू. पाटील, ओबीसी मोर्चाचे राज्य कार्यकारणी सदस्य आबासाहेब राजेंद्र वाघ,नगरसेवक विलास महाजन, एच.डी.माळी, गोरक देशमुख,राजु महाजन, तुषार पाटील,दिनेश भदाणे,प्रफुल्ल पवार, विक्रम पाटील तसेच माळी व पाटील समाज पंच मंडळाचे सर्व सन्माननीय संचालक व समाजबांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.कार्यक्रमाचे सूत्रसंचलन पी.डी.पाटील तर आभार लक्ष्मणराव पाटील यांनी मानले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here