✒️शेख आतिख(तलवाडा प्रतिनिधी)
गेवराई(दि.6डिसेंबर):-तालुक्यातील तलवाडा येथे प्रतिवर्षा प्रमाणे याही वर्षी सर्व धर्मीय समाज बांधव व सर्व पक्षीय पदाधिकारी पोलीस व पत्रकार बांधवांच्या उपस्थिती मध्ये महापरिनिर्वाण दिनाच्या साग्धिन्यात पावन स्मृतिस ऊजाळा देन्याहेतु ज्ञानाच्या अथांग महासागरास विनम्र अभिवादन करण्यात आले. गेवराई तालुक्यातील तलवाडा येथे डाॅ. बाबासाहेब आंबेडकर चौक, जुने बस स्थानक या ठिकाणी डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांचा पुर्णाकृती पुतळा असुन या ठिकाणी सकाळी ९.वाजता समाज बांधवांच्या वतीने अभिवादन सभेचे आयोजन या गावातील आदर्श शिक्षक विजय डोंगरे सर यांनी केले होते.
या वेळी तलवाडा ग्रामपंचायतचे सरपंच प्रतीनिधी विष्णू हात्ते, उपसरपंच आक्रम सौदागर, माजी जी. प. सदस्य अॅड सुरेश हात्ते, माजी जि. प. सदस्य युवराज तात्या डोंगरे, माजी प. समिती सदस्य शाम अबा कुंड, समता परिषदचे गेवराई तालुकाध्यक्ष पत्रकार श्री बाप्पु अण्णा गाडेकर, तलवाडा पोलीस स्टेशनचे सपोनि प्रताप नवघरे, माजी सभापती गिताराम डोंगरे, दादाराव रोकड़े,गणेश कचरे, शेख खिजर सौदागर, बाळू शिंगारे, धोडीबा हातागळे ऊपस्थित होते.
या अभिवादन सभेचे सुत्रसंचलन तलवाडा गावचे आदर्श शिक्षक व धम्म प्रचारक विजय डोंगरे सर यांनी केले. या वेळी उपस्थित आणेक मान्यवरांनी ज्ञानाचे अथांग महासागर डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पावन स्मृतिस ऊजाळा देत आप आपल्या मनोगताच्या माध्यमातून विनम्र अभिवादन केले. या वेळी तलवाडा पंचक्रोशीतील सर्व धर्मीय समाज बांधव मोठया संख्येने उपस्थित होते.