✒️सिद्धार्थ दिवेकर(उमरखेड प्रतिनिधी)
उमरखेड(दि.6डिसेंबर):– भगवती देवी विद्यालय, देवसरी ता. उमरखेड येथे निसर्गरम्य भव्य प्रांगणात अशोक वृक्षाच्या छायेखाली कार्यक्रमाला सुरुवात झाली. *महापरिनिर्वाणदिन* कार्यक्रमाचे अध्यक्ष डॉ. पांडुरंग शिरफुले सर यांच्या व उपस्थितांच्या हस्ते भारतरत्न विश्वरत्न भारतीय घटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. व सर्व उपस्थित मान्यवरांचे व अध्यक्षांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत विद्यार्थ्यांनी केले. याच वेळेस विद्यालयातील ज्येष्ठ शिक्षक मराठी विभाग प्रमुख दिगांबर माने सर यांनी अध्यक्षांना तथा विद्यालयास भारताचे संविधान हा ग्रंथ भेटदेण्यात आला. व कार्यक्रमाला सुरुवात झाली.
यावेळेस खुषी विनायते हिने भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनावर गीत गायन केले. विद्या शिंदे ओमकार माने आदित्य कदम कु. वैष्णवी पाईकराव युवराज कदम कु. तेजस्विनी पाईकराव अभय वानखेडे कु. दुर्गा शिंदे तर अध्यक्षीय भाषण पांडुरंग शिरफुले यांनी डॉ. बाबासाहेबांना आपल्या विचारातून बाबासाहेब हे एक चालतबोलत विद्यापीठ होत. स्वतःच्या कर्तृत्वाने देशात विदेशात शिक्षण घेतले. लंडन येथे जाऊन ऑक्सर विद्यापीठातून शिक्षण घेतले तर संविधान पुस्तकेत 395 कलमाचे कलम लिहिल्या गेले. संविधानातील विविध कलमा विषयी माहिती दिली. शिवरायांनी तलवारीच्या बळावर देशातराज्य केले. त्याचप्रमाणे डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी आपले विचार व पेनिच्या भरोशावर देशातील लोकांच्या मनावर आपल्या विचाराचे प्रतिबिंब उमटण्याचे कार्य केले.
व शेवटी *शिका संघटितव्हा संघर्ष* करा हे विचार तुम्ही आम्ही अमलात आनले पाहिजे. सर्वांनी शिक्षण घेतले पाहिजे. शिक्षणात ताकद आहे. असे विचार त्यांनी अध्यक्षीय भाषणात व्यक्त केले.यावेळेस विद्यालयातील दिनेश वानरे शेख सत्तार गणेश शिंदे राजेश सुरोसे अनिल अल्लडवार भागवत कबले सौ. मीनाताई कदम मारोती महाराज अरविंद चेपुरवार तर विद्यार्थी प्रतिनिधी कृष्णा कदम व कु. वैष्णवी कदम होते. यावेळेस कु. अंबिका पांचाळ हिने सुंदरअसा पुष्पगुच्छ तयार केल्यामुळे तिचे विशेष स्वागत अध्यक्षांनी केले. या कार्यक्रमाचे संचालन कु. सुजल राणे तर आभार प्रदर्शन कु. तनवी राणे हिने केले व कार्यक्रमाची सांगता झाली. अतिशय बहारदार कार्यक्रम विद्यालयात पार पडला.
“डाॕ.बाबासाहेब आंबेडकरांच्या दूरदृष्टीतील भारत जगावर अधिराज्य निर्माण करु शकते”