Home चंद्रपूर यंग चांदा ब्रिगेड कार्यालयात भारतरत्न, महामानवास अभिवादन

यंग चांदा ब्रिगेड कार्यालयात भारतरत्न, महामानवास अभिवादन

129

✒️रोशन मदनकर(उप संपादक)

चंद्रपूरदि.६ डिसेंबर):-मंगळवार रोजी मा.आ.किशोरभाऊ जोरगेवार जनसंपर्क व यंग चांदा ब्रिगेड घुग्घुस कार्यालयात परमपूज्य भारतरत्न, घटनेचे शिल्पकार, महामानव ड्राॅ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस माल्यार्पण प्रतिमेसमोर मेणबत्ती प्रज्वलित करुन महापरिनिर्वाण दिनानिमित्त विनम्र अभिवादन करण्यात आले.याप्रसंगी उपस्थित मान्यवराच्या हस्ते सामूहिक बुद्धवंदना घेण्यात आले.

यावेळी मनोगत व्यक्त करतांना यंग चांदा ब्रिगेड व बहुजन. महिला आघाडी शहराध्यक्षा सौ.उषाताई आगदारी म्हणाले मानवी हक्कांचे कैवारी, जागतिक दर्जाचे भारतीय अर्थशास्त्रज्ञ, कायदेपंडीत, राजनीतिज्ञ, लेखक, समाज सुधारक, स्वतंत्र भारताचे पहिले कायदामंत्री, भारतीय संविधानाचे जनक, दीन दालतांच्या जीवनाला जखडलेल्या गुलामगिरीच्या शृंखला तोडणारा महायोद्धा, उपेक्षितांच्या जीवनामध्ये अस्मितेची ज्योत पेटवणारा प्रकाशसूर्य तसेच स्वत: च्या अलौकिक विद्धत्तेचा वापर समाजहितासाठी करणारा, अस्पृश्यता मिटनवण्यासाठी चढनापरिस आपला जीव झिजवणारे, आपल्या बांधवांच्या उन्नतीसाठी अहोरात्र झटणारे, समतेसाठी सत्याग्रह करणारे आणि भारताचे एक अमूल्य रत्नू ज्यांना महामानव म्हणून संबोधले जाते. असे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना वंदन करते.

दोन मिनिट सामूहिक मोन करुन महामानवाच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त विनम्र अभिवादन करण्यात आले.

यावेळी कामिनी देशकर, जोत्स्यना मस्के,किरण टिपले, सुजाता देशकर, उर्मिला लिहीतकर, भाविका आटे, भारती सौदारी, आशाताई रामटेके, मधुकर पाटील, विक्की सोदारी, अशोक रामटेके, चंदू घागरगुंडे, गणपत लभाणे,भुदेवी अटेला,अनिल कांबळे उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here