Home महाराष्ट्र वेदांत विद्यालयातील विद्यार्थ्यांचे महामानवास प्रेरणादायी अभिवादन

वेदांत विद्यालयातील विद्यार्थ्यांचे महामानवास प्रेरणादायी अभिवादन

114

✒️अनिल साळवे(गंगाखेड प्रतिनिधी)

गंगाखेड(दि.6डिसेंबर):-महामानव, प्रज्ञा सूर्य, भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या 66 व्या महापरिनिर्वाण दिना निमित्त वेंदात विद्या मंदिर शाळेतील विद्यार्थ्यांनी महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना प्रेरणादायी उपक्रम राबवला आहे अभिवादन म्हणून गरजू विद्यार्थ्यांना पेन उपलब्ध व्हावी म्हणून शाळेने पेन संकलीत करण्यात आल्या.

या उपक्रमात विद्यार्थ्यांनीस भरभरून प्रतिसाद मिळाला सर्व पेन गरजू विद्यार्थ्यांना देण्यात येणार असल्याचे शाळेचे मुख्याध्यापक चंद्रशेखर गरड यांच्यावतीने सांगण्यात आले.सहा डिसेंबर रोजी शाळेच्या प्रांगणात डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त अभिवादन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्राथमिक शाळेचे मुख्याध्यापक उदय कुलकर्णी ,प्रमुख पाहुणे म्हणून सामाजिक कार्यकर्ते वसंतराव रायभोळे, पत्रकार गुणवंत कांबळे हे उपस्थित होते.

या कार्यक्रमाप्रसंगी विद्यार्थी ऋषिकेश घुलेश्वर ,वैभव लटपटे, प्राजक्ता बडवणे, सायली कांबळे, गौरव कुलकर्णी, चिन्मय कुलकर्णी आराध्य नावंदर ,गौरी नावंदर ,अनन्या आरबुने, यांनी आपले मनोगत व्यक्त केले.वसंतराव रायभोळे व गुणवंत कांबळे यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी शिवदास जाधव सर, दत्ता घोडबांड सर अनिरुद्ध पूरबूज सर तुपेकर सर परगे सर पौळ सर वाळके सर वावधने सर शीलवंत कांबळे सर व सर्व शिक्षकवृंद यांनी परीश्रम घेतले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here