✒️पेनूर(पुरोगामी न्यूज नेटवर्क)
पेनूर (ता.मोहोळ)(दि.6डिसेंबर):-येथे सम्राट विचार मंच यांच्या वतीने भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या ६६ व्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त अभिवादन करण्यात आले.
प्रारंभी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करण्यात आला.तसेच दीप प्रज्वलन करुन सामुहिक त्रिसरण पंचशिल घेऊन अभिवादन करण्यात आले.
बौद्ध धर्मानुसार महापरिनिर्वाण हे आयुष्याचे प्रमुख तत्व आणि ध्येय देखील आहे. संस्कृतमध्ये महापरिनिर्वाण या शब्दाचा अर्थ ‘परिणीबाना’ असा सांगितला आहे, याचाच अर्थ ‘मोक्ष’ असा होतो. बौद्ध धर्मानुसार, जो निर्वाण प्राप्त करतो तो सांसारिक वासना आणि जीवनातील वेदनांपासून आणि जीवन चक्रातून मुक्त होतो, म्हणजेच तो पुन्हा पुन्हा जन्म घेणार नाही. लक्षावधी अनुयायांसह बौद्ध धर्म स्वीकारला होता. बौद्ध धर्मातील लोक बाबासाहेबांना ‘बोधिसत्व’ मानतात. त्यामुळं त्यांच्या पुण्यतिथीसाठी ‘महापरिनिर्वाण’ हा बौद्ध संकल्पनेतील शब्द वापरण्यात आला आहे.
यावेळी शिवाजी आवारे,सिध्देश्वर पवार,महादेव आवचारे,दशरथ वाघमारे,केशव पवार,सौरभ आवारे,आनंद आवचारे,आण्णासाहेब आवारे,आण्णासाहेब सावंत,प्रणव आवारे,लखन सोनवणे,गौरव आवारे,सुदेश आवचारे,जय आवारे,यशवंत आवचारे,आप्पा आवचारे,मसु सावंत,सतिष आवचारे,विशाल माने,रोहन पोरे,गणेश पाखरे,अजय शिंदे,राजू माळी,भागवत गवळी,सचिन गवळी,बालाजी गवळी,अशोक आवचारे,हनुमंत आवचारे,सूरज आवचारे,निलरत्न आवारे,समर्थ फाळके आदी उपस्थित होते.