🔹एमपीजे च्या बंधुता अभियाना अंतर्गत उपक्रम
✒️सिध्दार्थ दिवेकर(जिल्हा प्रतिनिधी,यवतमाळ)मो:-9823995466
उमरखेड(दि. 6 डिसेंबर):-संविधानाच्या उद्देशानुसार मानवाला मानव आदराच्या परिपूर्ण समाज व्यवस्थेची फार गरज आहे. हे कार्य जरी अवघड वाटत असले तरीही ते फार आवश्यक आहे.
समाजातील विविध संप्रदायांमध्ये आपापसात बंधुता नांदावी यासाठी वातावरण निर्मिती व्हावी ,भारताच्या संविधानिक विचारांना चालना मिळावी.
देशाचे एकता व अखंडता कायम राखून बंधुभाव वाढावा, संपूर्ण समाज बंधुत्वाच्या भावनेने एकत्र यावा ,न्याय , स्वातंत्रता, समता व बंधुभाव प्रस्थापित व्हावा यासाठी संपूर्ण राज्यात दिनांक 26 नोव्हेंबर संविधान दिवस ते दहा डिसेंबर मानवाधिकार दिवस पर्यंत हे अभियान राबविण्यात येत आहे .
याच अभियाना अंतर्गत उमरखेड शहरात दिनांक 7 डिसेंबर बुधवार रोजी बंधुता मानव साखळीचे आयोजन करण्यात आले आहे . सदर मानसाखळी गांधी पुतळा महात्मा गांधी चौक ,माहेश्वरी चौक तसेच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळ्याजवळ दुपारी 12 ते 1.30 पर्यंत करण्यात येणार आहे,
शहरातील संविधान प्रेमी ,समाज सेवक, सामाजिक संघटनांनी या बंधुता मानव साखळीत सहभाग नोंदविण्याचे आवाहन तालुका अध्यक्ष अन्सार हुसैनी यांनी एक प्रसिद्धी पत्रकाद्वारे केले आहे.