Home महाराष्ट्र सामाजिक न्याय विभागाच्या “समता पर्व” अंतर्गत ज्येष्ठ नागरिक, तृतीयपंथीय व दिव्यांग व्यक्तींची...

सामाजिक न्याय विभागाच्या “समता पर्व” अंतर्गत ज्येष्ठ नागरिक, तृतीयपंथीय व दिव्यांग व्यक्तींची एकदिवशीय कार्यशाळा उत्साहात संपन्न !….

177

✒️धरणगाव प्रतिनिधी(पी.डी.पाटील सर)

धरणगाव(दि.6डिसेंबर):-महाराष्ट्र शासनाच्या सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाच्या वतीने संपुर्ण महाराष्ट्रात दि.26 नोव्हेंबर, 2022 ते 6 डिसेंबर, 2022 पर्यंत “सामाजिक समता पर्व” साजरा करण्याचे नियोजन करण्यात आले आहे. आज दि. 5 डिसेंबर, 2022 रोजी सहायक आयुक्त, समाज कल्याण, जळगाव येथील सामाजिक न्याय भवन येथे ज्येष्ठ नागरिक, तृतीयपंथीय व दिव्यांग व्यक्तीचे एकदिवशीय कार्यशाळा मोठया उत्साहात संपन्न झाली. कार्यक्रमांचा प्रसंगी मंचावर श्री. योगेश पाटील, सहायक आयुक्त, समाज कल्याण, जळगाव, श्री. पंडीतराव रामदास सोनार, अध्यक्ष, चैतन्यनगर ज्येष्ठ नागरिक संघ व अशासकीय सदस्य, जिल्हा ज्येष्ठ नागरिक जिल्हास्तरीय समिती, श्री. सिध्दार्थ नेतकर, सेवानिवृत्त उपशिक्षण अधिकारी, श्री.जगतराव पाटील, अध्यक्ष, खान्देश प्रादेशिक फेस्कॉम संघ, जळगाव, ॲड. श्री. अरुण धांडे उपस्थित होते.

कार्यक्रमाच्या सुरुवातीला महापुरुषांच्या प्रतिमेचे पूजन व पुष्पहार अर्पण करुन कार्यक्रमाचे उदघाटन करण्यात आले. तसेच श्री. योगेश पाटील, सहायक आयुक्त, समाज कल्याण, जळगाव यांनी कार्यक्रमाची प्रास्ताविक केले, प्रास्ताविकात संविधान दिनानिमित्त आयोजित सामाजिक समता पर्व अंतर्गत घेत अलेले कार्यक्रम व ज्येष्ठ नागरिकांसाठी विविध कायदे व योजना तसेच, तृतीयपंथीयांसाठी विविध कायदे व योजना व दिव्यांग व्यक्तीसांठी विविध कायदे व योजना याविषयी माहिती देण्यात आली. तसेच संविधानाने उत्कृष्ट नागरिक घडविण्यासाठी विविध हक्क, कर्तव्य तसेच सामाजिक सलोखा राखण्यासाठी असलेले विविध नियम याबाबत माहिती दिली. प्रमुख व्याख्याते श्री. सिध्दार्थ नेतकर यांनी कार्यशाळेत मार्गदर्शन करतांना सर्व जाती-धर्मीयांसाठी असलेल्या धम्म यात्रेऐवजी ज्येष्ठ नागरिकांना विशेष आरोग्य सुविधा उपलब्ध करुन प्राधान्य दिले पाहिजे.

तसेच पैसा व व्यक्ती याबाबत चर्चा केली असता सध्याची पिढी पैश्यांना जास्त महत्व देत असल्याचे सांगितले परंतु मानवाला केंद्रबिंदु मानून महत्व दिले पाहिजे. तसेच Life begins at Forty असे लोक म्हणतात, परंतु त्यांनी मात्र Life begins at Pension असे असल्याचे मत व्यक्त केले. आनंद व समाधान बाबत मत व्यक्त करतांना म्हटले की, एका मुठीत आनंद तर दुस-या मुठीत समाधान असल्याचे सांगताना इच्छा व अपेक्षा कमी असल्या तरच ते आपल्या मुठीत असतात, तसेच प्रत्येकाने आपली जीवनशैलीत स्वत:हून बदल केला पाहिजे असे ज्येष्ठ नागरिकांना मार्गदर्शन करतांना सांगितले.

तसेच श्री. पंडीतराव रामदास सोनार यांनी देश स्वातंत्रय झाला 1947 ला मात्र संविधानामुळे खरे व्यक्तीस्वातंत्रय मिळाल्याची भावना व्यक्त केली. तसेच मुलभूत हक्कांबरोबर संविधानामुळे मतदानाचा हक्क, शिक्षणाच्या अधिकार यासारखे अनेक अधिकार समाजातील प्रत्येक घटकाला मिळाले असे मनोगत व्यक्त करतांना सांगितले. तदनंतर, ॲड. श्री. अरुण धांडे यांनी संविधान म्हणजे देशाचा राज्यकारभार सुरळीत चालविण्यासाठीचे नियम होय. संविधानातील मुलभूत हक्कांना अजाळा देऊन संविधाना मुलभूत हक्कांची उत्तम मांडणी केली असल्याचे सांगितले. तसेच ज्येष्ठ नागरिकांचे संघ अधिक बळकट होण्यासाठी संविधानामुळे नक्कीच पाठबळ मिळत असल्याचे सांगितले. तदनंतर श्री.जगतराव पाटील यांनी समाजातील वंचित घटकांचे भवितव्य घडावे यासाठी समाज कल्याण विभाग नेहमीच कार्यरत असल्याची भावना व्यक्त करुन तालुका स्तरावर ग्रामीण भागात ज्येष्ठ नागरिकांच्या कार्यशाळेचा आयोजनाचा मानस याप्रसंगी व्यक्त केला.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री. अनिल पगारे, तालुका समन्वयक यांनी तर, आभार प्रदर्शन श्री.किशोर माळी, तालुका समन्वयक यांनी केले. सदर कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी श्री. राजेंद्र कांबळे, कार्यालयीन अधिक्षक, श्री.महेंद्र चौधरी, समाज कल्याण निरीक्षक व कार्यालयाचे इतर कर्मचारी, तालुका समन्वयक, तसेच विविध मंडळांचे अधिकारी व कर्मचारी यांनी परिश्रम घेतले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here