Home महाराष्ट्र गोसेखुर्द प्रकल्पात अधिग्रहण करण्यात आलेल्या जमिनीची विक्री करण्यासाठी अनुदान उपलब्ध करून द्या...

गोसेखुर्द प्रकल्पात अधिग्रहण करण्यात आलेल्या जमिनीची विक्री करण्यासाठी अनुदान उपलब्ध करून द्या –प्रा. अमृत नखाते

213

✒️रोशन मदनकर(उप संपादक)

ब्रम्हपुरी(दि.5डिसेंबर):-ब्रम्हपुरी, नागभीड, सावली व चिमूर तालुक्यातील गोसेखुर्द प्रकल्पामध्ये अनेक शेतकर्‍यांच्या शेतजमिनी गेल्या आहेत. यात काही शेतकर्‍यांच्या शेतजमिनीची विक्री प्रशानाने करून घेत जमिनीचे अधिग्रहन करण्यात आले.

गोसेखुर्द कार्यालयाकडे निधी उपलब्ध नसल्या कारणास्तव अद्यापही अनेक शेतकर्‍यांच्या शेतजमिनींची विक्री करून देण्यात आली नाही. गेल्या कित्येक दिवसांपासून शेतकर्‍यांच्या शेतजमिनी गोसेखुर्द प्रशासनाने अधिग्रहित करून सुद्धा निधी अभावी विक्री होत नसल्याने शेतकरी चिंतातूर आहेत.

विक्री करण्यसाठी शेतकरी बांधव वारंवार गोसेखुर्द कार्यालयात येरझर्या मारत असून संबंधित विभागाकडे विचारणा केली असता निधी उपलब्ध नसल्याचे सांगण्यात येत आहे. गोसेखुर्द कार्यालयास जमीन अधिग्रहनासाठी शासनाने त्वरीत अनुदान उपलब्ध करून देण्यात यावे.

या प्रमुख मागणीसाठी शिवसेना चिमूर विधानसभा क्षेत्राचे उपजिल्हाप्रमुख प्रा. अमृत नखाते यांनी मान.मुख्यमंत्री (म.रा.), मान.जलसंपदा मंत्री, मान. महसूलमंत्री, मान.पालकमंत्री जिल्हा चंद्रपूर, मान. जिल्हाधिकारी चंद्रपूर यांना उपविभागीय अधिकारी संदीप भस्के यांच्या मार्फत निवेदन प्रेषित करण्यात आले.

महापरिनिर्वाण दिन कसा पाळावा ?

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here