Home महाराष्ट्र पी.डी.पाटील यांना राष्ट्रपिता महात्मा ज्योतिराव फुले जिल्हास्तरीय गुणवंत सत्यशोधक शिक्षक पुरस्काराने सन्मानित

पी.डी.पाटील यांना राष्ट्रपिता महात्मा ज्योतिराव फुले जिल्हास्तरीय गुणवंत सत्यशोधक शिक्षक पुरस्काराने सन्मानित

138

🔸 पुरस्काराने ऊर्जा व प्रेरणा मिळते – पुरस्कारार्थी पी.डी.पाटील

✒️धरणगाव प्रतिनिधी(पी.डी.पाटील सर)

धरणगांव(दि.4डिसेंबर):-रोजी जळगांव येथील अल्पबचत भवन येथे येथील सुवर्ण महोत्सवी शाळा महात्मा फुले हायस्कूलचे आदर्श शिक्षक पी.डी.पाटील यांना २०२२, ह्या वर्षाचा प्रोटॉन शिक्षक संघटनेकडून जिल्हास्तरीय सत्यशोधक महात्मा जोतीराव फुले आदर्श शिक्षक पुरस्कार सन्मानित करण्यात आले.कार्यक्रम सोहळ्याचे प्रास्ताविक आनंद जाधव यांनी केले.

अध्यक्षस्थानी प्रोटॉन शिक्षक संघटनेचे जिल्हाध्यक्ष मिलिंद भालेराव होते. कार्यक्रमाचे उद्घाटन उपशिक्षणधिकारी ए.आर.शेख यांच्या हस्ते करण्यात आले. एकूण ३३ पुरस्कारार्थी आदर्श शिक्षकांना पुरस्कार प्रदान करण्यात आला. तसेच प्रमुख अतिथी माध्यमिक चे शिक्षणाधिकारी नितीन बच्छाव, प्राथमिक चे शिक्षणाधिकारी विकास पाटील, गटशिक्षणाधिकारी अशोक बिऱ्हाडे अमळनेर, विजय पवार जळगांव, विकास भोई चाळीसगाव, राजेंद्र महाजन एरंडोल, नईम शेख यावल, रविकिरण बिऱ्हाडे धरणगाव, भास्कर लहासे बोदवड, सचिन परदेशी भडगाव, जे.डी.पाटील होते. सन्माननीय मान्यवरांच्या हस्ते सन्मानचिन्ह, प्रशस्तीपत्र, ग्रंथ, पुष्पगुच्छ देऊन गौरविण्यात आले.

अधिवेशन व पुरस्कार वितरण सोहळ्याचे प्रमुख वक्ते प्रोटॉन शिक्षक संघटनेचे राज्य उपाध्यक्ष गणेश काकडे यांनी उपस्थितांना अनमोल मार्गदर्शन केले. तद्नंतर कार्यक्रमाचे अध्यक्ष मिलिंद भालेराव यांनी शिक्षकांच्या समस्येबाबत प्रोटॉन संघटना कायम सोबत राहील असे मनोगत व्यक्त केले.जिल्हाधिकारी कार्यालय जळगांव येथील अल्पबचत भवन येथे पी.डी.पाटील यांची शैक्षणिक, सामाजिक व सांस्कृतिक कार्याची दखल घेऊन बामसेफचे राज्य कार्याध्यक्ष सुमित्र अहिरे, प्रोटॉन शिक्षक संघटनेचे राज्य उपाध्यक्ष गणेश काकडे, कार्याध्यक्ष मुबारक शहा, कोषाध्यक्ष मिलींद निकम, भारत मुक्ती मोर्चाचे राज्य महासचिव मोहन शिंदे, आर.बी.परदेशी, ओबीसी मोर्चाचे प्रदेश कार्यकारणी सदस्य आबासाहेब राजेंद्र वाघ, व्याख्याते लक्ष्मणराव पाटील, प्रोटॉनचे सुनील देशमुख व उपस्थित मान्यवरांच्या हस्ते पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.

पी.डी.पाटील यांना यापूर्वी २ राज्यस्तरीय , १ खान्देशस्तरीय, २ जिल्हास्तरीय, २ तालुकास्तरीय असे एकूण ७ पुरस्कार मिळालेले आहेत. तात्यासाहेबांच्या स्मृतिदिनी आजचा हा ८ वा जिल्हास्तरीय सत्यशोधक महात्मा जोतीराव फुले आदर्श शिक्षक पुरस्कार मिळाला. हीच माझ्या सामाजिक – शैक्षणिक कार्याची पावती आहे. पुरस्काराने प्रेरणा व ऊर्जा मिळते असे प्रतिपादन पी.डी.पाटील यांनी केले. याप्रसंगी पाटील यांचे सामाजिक, शैक्षणिक, वैचारिक क्षेत्रातील मित्र परिवाराकडून अभिनंदन व कौतुक करण्यात आले.

सूत्रसंचलन मुबारक शहा यांनी तर आभार यशराज निकम यांनी मानले. अधिवेशन व पुरस्कार वितरण सोहळा यशस्वीतेसाठी प्रोटॉन शिक्षक संघटनेचे सर्व सन्माननीय पदाधिकारी व कार्यकर्ते यांनी परिश्रम घेतले.

शेळी होऊन शंभर दिवस जगण्या पेक्षा……!

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here