✒️मनोहर गोरगल्ले(पुणे जिल्हा प्रतिनिधी)
राजगुरुनगर(दि-४डिसेंबर):-क्षेत्र निमगाव खंडोबा येथे तालुकास्तरीय शालेय विद्यार्थी वय १४ वर्ष,१७ वर्ष,१९ वर्ष, व मुली १४ वर्ष, १७ वर्ष, १९वर्षीय वयोगटातील तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धाचे आयोजन क्रीडा व युवक सेवा संचालनालय महाराष्ट्र राज्य पुणे अंतर्गत जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय पुणे व खेड तालुका क्रीडा अधिकारी कार्यालय खेड, खेड तालुका क्रीडा शिक्षक संघटना व न्यू इंग्लिश स्कूल निमगाव यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आली होती.
या स्पर्धेत खालील संघांनी विजय मिळवला. १४ वर्षे वयोगट मुली, प्रथम क्रमांक वसंतराव मारुतराव मांजरे विद्यालय मांजरेवाडी, द्वितीय क्रमांक राष्ट्रीय विद्यालय कुरकुंडी, तृतीय क्रमांक द्वारका इंग्लिश मीडियम स्कूल महाळुंगे, १७ वर्षे वयोगट मुली, प्रथम क्रमांक वसंतराव मारुतराव मांजरे विद्यालय मांजरेवाडी, द्वितीय क्रमांक भैरवनाथ विद्यालय किवळे, तृतीय क्रमांक मामासाहेब मोहोळ बहुउद्देशीय प्रशाला वाशेरे, १९ वर्षे वयोगट, प्रथम क्रमांक हुतात्मा राजगुरू महाविद्यालय राजगुरुनगर, द्वितीय क्रमांक श्री शिवाजी विद्यालय व ज्युनिअर कॉलेज चाकण, तृतीय क्रमांक पि के खांडेभराड महाविद्यालय कडाचीवाडी, १४ वर्षे मुले, प्रथम क्रमांक वसंतराव मारुतराव मांजरे विद्यालय माजरेवाडी, द्वितीय क्रमांक हुतात्मा गांधी विद्यालय राजगुरुनगर, तृतीय क्रमांक महाराजा पतीसह गायकवाड विद्यालय दावडी, १७ वर्षे वयोगट मुले, प्रथम क्रमांक महाराजा फत्तेसिंह गायकवाड विद्यालय दावडी, द्वितीय क्रमांक भैरवनाथ विद्यालय वाकी, तृतीय क्रमांक हुतात्मा राजगुरू महाविद्यालय राजगुरुनगर, 19 वर्ष मुले, प्रथम क्रमांक हुतात्मा राजगुरू महाविद्यालय राजगुरुनगर, द्वितीय क्रमांक श्री शिवाजी विद्यालय व जुनिअर कॉलेज चाकण, तृतीय क्रमांक श्री शिवाजी विद्यालय शेल पिंपळगाव,या प्रमाणे संघ विजयी झाले.
विजयी संघाने हातात ट्रॉफी हातात घेऊन आनंदोत्सव साजरा केला. सर्व मुली आनंदात गाण्याच्या तालावर नाचताना दिसत होत्या. कार्यक्रमाचे आयोजन पैलवान.राजकुमार शिवाजी राऊत अध्यक्ष महाराजा कबड्डी संघ निमगाव, रामदास रेटवडे अध्यक्ष तालुका क्रीडा शिक्षक संघटना,श्री लतीफ शेख सचिव तालुका क्रीडा शिक्षक संघटना, नितीन वरकड उपाध्यक्ष, अण्णासाहेब कोडम, सहसचिव कुंडलिक गारगोटे, संदीप कोळेकर, एकनाथ टोपे, श्री मिलिंद सोनवणे मुख्याध्यापक न्यू इंग्लिश स्कूल निमगाव, सौ प्रतिभा वळसे क्रीडा शिक्षक न्यू स्कूल निमगाव यांनी केले.
यावेळी तालुक्यातील मुलांच्या १०२ शाळेंच्या संघांनी भाग घेतला असून मुलींच्या ६८ संघांनी भाग घेतला आहे. फेडरेशनचे रामदास फुगे, प्रकाश गाडे राजन कांबळे सतीश घाडगे, बंटी साबळे, उमेश गाडगे, असे एकूण बारा पंच काम करत होते. यावेळी त्यांनी तालुका क्रीडा शिक्षकांना कार्यक्रमाचे चांगले नियोजन केले. कार्यक्रमाला गटशिक्षणाधिकारी जीवन साहेब हे उपस्थित राहून त्यांनी खेळाडूंना मार्गदर्शन केले. बक्षीस वितरण माजी सरपंच शिवाजी किसन राऊत मोहनराव शिंदे मुख्याध्यापक मिलिंद सोनवणे, पैलवान राजकुमार राऊत अध्यक्ष महाराजा कबड्डी संघ निमगाव रावडी व इतर मान्यवरांच्या हस्ते यावेळी करण्यात आली