✒️रोशन मदनकर(उप संपादक)
ब्रम्हपूरी(दि. 4 डिसेंबर):- शहरातील कुर्झा वार्ड येथे राहणाऱ्या विनायक शिवराम चोले याचे घरी पोलीसांनी छापा टाकून त्याचे घरातून 1.882 कि.ग्रॅ. गांजा अं.कि. 4000 रू. जप्त केला. आरोपीस ताब्यात घेउन त्याचेवर कार्यवाही करण्यात आली.
दि. 03/12/2022 रोजी रात्रौ 3.52 वा. दरम्यान ब्रम्हपूरी पोलीसांना गोपनीय माहिती मिळाली कि. रीकॉर्डवरील सराईत गुन्हेगार विनायक शिवराम चोले, रा. कुर्झा वार्ड, ब्रम्हपूरी याचे राहते घरी अवैधरीत्यारीत्या गांजा ठेवून आहे.
त्यावरून पोलीसांनी पंचासह त्याचे घरी छापा टाकला असता त्याचे घरात कॉलेज बॅगमध्ये लपवून ठेवलेला 1.882 कि.ग्रॅ. गांजा अं.कि. 4000 रू. पंचनामा कार्यवाही करून जप्त करण्यात आला. आरोपीला ताब्यात घेउन मालासह पोस्टेला आणण्यात आले. त्याचेवर अप. क्र. 595/ 22 कलम 20 (ब) एन.डी.पी.एस. अॅक्ट सन 1985 अन्वये गुन्हा नोंद करून अटक करण्यात आले.
सदरची कार्यवाही श्री. मिलींद शिंदे, उपविभागीय पोलीस अधिकारी ब्रम्हपूरी, यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस स्टेशन ब्रम्हपूरीचे ठाणेदार रोशन यादव, सपोनी प्रशांत ठवरे, मपोउपनी स्वाती फुलेकर नापो / 1734 योगेश शिवनकर, नापो / 2552 मुकेश गजबे, पोशी / 2332 संदेश देवगडे, मनापोशी / 580 शुभांगीनी शेमले यांनी केलेली आहे. गुन्हयाचा पूढील तपास पोलीस उपनिरीक्षक मपोउपनी स्वाती फुलेकर करीत आहेत.