🔹अनुसूचित जाती मुलींच्या शासकिय निवासी शाळेत स्पर्धा परीक्षा मार्गदर्शक कार्यशाळेत प्रतिपादन
✒️बाळासाहेब ढोले(पुसद प्रतिनिधी)
पुसद(दि.4डिसेंबर):- संविधान दिनाच्या समतापर्वा (२६ नोव्हेंबर ते ६ डिसेम्बर) या पर्वा निमित्ताने असारपेठ धुंदी येथील अनुसूचित जाती मुलींच्या शासकिय निवासी शाळेत विविध कार्यक्रम घेण्यात येत आहे त्याच अनुषंगाने २ डिसें रोजी स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते .
यामध्ये वर्ग ६ ते १०वीच्या मुलींना मार्गदर्शन करण्यासाठी प्रमुख अतिथी व मागर्दशक म्हणून पुसद वरून प्रा.सय्यद सलमान सरांना बोलविण्यात आले होते. सरांना मुलांना केंद्रीय लोकसेवा आयोग आणि महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या विविध स्पर्धा परीक्षे बद्दल माहिती दिली आणि मोठे अधिकारी होण्यासाठी प्रोत्साहन दिले सोबतच १० वी नंतरच्या वेग वेगळ्या शाखा दाखविल्या आणि करिअर साठी अनेक पर्याय सुद्धा सांगितले परन्तु स्पर्धा परीक्षा ही सर्व मुली अत्यन्त सोप्या पद्धतीने करू शकतात हे आपल्या मार्गदर्शनात सांगितले.
तसेच डॉ.बाबासाहेब आंबेडकरांच्या च्या खडतर जीवन प्रवासाविषयी मुलांना सांगिले व विध्यार्थीशी प्रश्न उत्तर संवाद साधून त्याच्या कडून सुद्धा उत्तरे मिळविली आणि मनोरंजन असा करिअर संवाद साधला विशेष म्हणजे या मध्यें इयत्ता ६ वी ते १०च्या १७० मुलीं १ तास बसून पूर्ण मागर्दशन अत्यंत शांती व शिस्तीने ऐकले आणि सकारात्मक असा प्रतिसाद दिला व भविष्यात आए,ए,इस व आए,पि, एस अधिकारी होण्याचे निश्चित केले.प्रा.सय्यद सलमान सर अश्या प्रकारचे प्रत्येक जाती धर्माच्या मुला,मुलींना अवघ्या महाराष्ट्रात सेमिनार करून स्पर्धा परीक्षेची जनजागृती निशुल्क करत आहे .
प्रा.सलमान सरांना स्पर्धा परीक्षेच्या शिकवणीचा ७ वर्षाचा अनुभव आहे व सर त्यासाठी ऑनलाइन युट्युब द्वारे सुद्धा मागर्दशन करतात तसेच प्रा.सलमान सर स्वतः मराठी भाषेत पि, एच,डी करत असल्या मुळे अत्यन्त शुध्द सध्या सोप्या भाषेत मागर्दशन करतात व मुलांमध्ये स्पर्धा परिक्षेची जनजागृती करतात सरांच्या मागर्दशना नन्तर शाळेकडून अभरपत्र सुद्धा सरांना प्रदान करण्यात आले आजच्या मागर्दशना मध्ये सुद्धा सरांनी वर्ग ८ वी पासूनच स्पर्धा परीक्षेची तयारी करण्यासाठी संगतिले व मुलांना त्यासाठी वेळापत्रक सुद्धा दिले अश्या प्रकारे आज निवासी शाळेत स्पर्धा परीक्षेच्या मागर्दशनाचा आगळा वेगळा कार्यक्रम पार पडला.
या शाळेत अश्या प्रकारचे वेग वेगळ्या विषयावर मागर्दशनाचे कार्यक्रम होतच असतात या कार्यक्रमचे अध्यक्षा मा. मुख्याध्यपिका सविता घरजारे मॅडम होत्या तर सूत्रसंचालन गडे मॅडम ने केले तसेच या कार्यक्रमाच्या आयोजनामध्ये चव्हाण सर,दिनेश सर,नाईक, सर,अमृते मॅडम याचे मोलाचे योगदान दिले.