🔹सर्व तालुक्यातून अभिनंदनचा वर्षाव केला जात आहे)
✒️सिध्दार्थ दिवेकर(जिल्हा प्रतिनिधी,यवतमाळ)मो:-9823995466
उमरखेड(दि.4डिसेंबर):-येथील गोपिकाबाई सिताराम गावंडे महाविद्यालयाच्या हॉकी या खेळामध्ये स्वामिनी अजय कुळकर्णी या एम. एससी. भौतिकशास्त्र द्वितीय वर्षात शिकत असलेल्या विद्यार्थिनीची दुसऱ्यांदा जनार्दन राय नगर राजस्थान विद्यापीठ, उदयपूर येथे दिनांक 20 डिसेंबर ते 24 डिसेंबर दरम्यान होणाऱ्या पश्चिम विभागीय आंतर विद्यापीठ क्रीडा स्पर्धेत संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाच्या हॉकी संघामध्ये निवड झाली आहे.
विद्यापीठाच्या हॉकी संघात दुसऱ्यांदा स्थान मिळवल्यामुळे तिची “कलर कोट” साठी निवड झाली म्हणून तिच्यावर सर्व तालुक्यातून अभिनंदनचा वर्षाव केला जात आहे.
तिला महाविद्यालयाचे शारीरिक शिक्षण व क्रीडा संचालक प्राध्यापक डॉ. बी. एम. सावरकर यांचे मार्गदर्शन लाभले.
या अभूतपूर्व यशाबद्दल यवतमाळ जिल्हा अखिल कुणबी समाज संस्थेचे अध्यक्ष राम देवसरकर, संस्थेचे सचिव डॉ.यादवराव राऊत, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एम. बी. कदम, उपप्राचार्य डॉ.व्हि.पी. कदम तसेच महाविद्यालयातील प्राध्यापक शिक्षकेतर कर्मचारी सर्व विद्यार्थी विद्यार्थिनींनी स्वामिनी चे कौतुक करून या स्पर्धेकरिता सर्वांनी शुभेच्छा व्यक्त केल्या.