✒️पंकज रामटेके(विशेष प्रतिनिधी)
घुग्घुस(दि.४ डिसेंबर):; रविवार सकाळ रोजी भारतरत्न, महामानव डाॅ.बाबासाहेब आंबेडकर स्टेडियम घुग्घुस येथे ग्राउंड स्टार मित्रपरिवार व सचिन कोचिंग क्लासेस तर्फे पोलीस भर्ती सराव पेपर घेण्यात आले. सराव पेपरसाठी ३० विद्यार्थ्यांनी सहभाग घेतले,शंभर (१००) गुणांचा पेपर देण्यात आले.
त्याचामध्ये २५ बुद्धिमत्ता चाचणी,२५ गणित, २५ सामान्य ज्ञान व २५ मराठी व्याकरण असे एकूण शंभर गुणांचा पेपर घेण्यात आला.
यावेळी सचिन अरतपायरे, दिपक पेंदोर, पंकज धोटे,अमोल पुरटकर, संदिप चुने,अखिल हस्तक, दिनेश गोंडाने,प्रज्ज्वल पाझारे, तुषार पाडेवार, राहूल डोर्लीकर,मारुती नागपूरे, दिलीप दुरडकर, पंकज जुमडे व सर्व भारतरत्न महामानव डाॅ.बाबासाहेब आंबेडकर स्टेडियम ग्राउंड मधील सर्व मित्रपरिवार उपस्थित होते.