Home महाराष्ट्र दिव्यांग विद्यार्थ्यांच्या पालकांनी मनातून खचून जाऊ नका, मुलांना साथ दया

दिव्यांग विद्यार्थ्यांच्या पालकांनी मनातून खचून जाऊ नका, मुलांना साथ दया

109

🔸दिव्यांग दिनी तहसीलदार प्राजक्ता बुरांडे यांचे पालकांना आवाहन

🔹राष्ट्रसंत तुकडोजी महाराज मुक बधीर विद्यालय येथे दिव्यांग दिन साजरा

✒️सुयोग सुरेश डांगे(विशेष प्रतिनिधी)

चिमूर(दि.4डिसेंबर):-दिव्यांग मुले सामान्य मुलापेक्षा गुणांनी कमी नसतात, त्यांना साथ दया, त्यांचा आत्मिश्वास वाढवायला हवा. अनेक दिव्यांग व्यक्तींनी गरुडझेप घेतली आहे. या विशेष बालकांत विशेष नैपुण्य असते ते समोर आणण्याचे काम आपल्याला करायचे असते.माझ्या वतीने तहसीलदार म्हणून मला या मुलांसाठी जेवढं करता येईल तेवढे सहकार्य करणार असे प्रतिपादन तहसीलदार प्राजक्ता बुरांडे यांनी केले.

राष्ट्रसंत तुकडोजी महाराज मुक बधीर विद्यालय येथे आयोजित केलेल्या राष्ट्रीय दिव्यांग दिन व क्रीडा स्पर्धा कार्यक्रमात उदघाटक म्हणून त्या बोलत होत्या.कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे उपाध्यक्ष विनायक हजारे होते.कार्यक्रमाचे उद्घाटन तहसीलदार प्राजक्ता बुरांडे यांनी केले तर कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून अन्नपुरवठा निरीक्षक अधिकारी आशिष फुलके, शिक्षक भारती संघटनेचे विभागीय सचिव सुरेश डांगे, सामाजिक कार्यकर्ते तथा पत्रकार श्रीहरी सातपुते, मुख्याध्यापक रामदास कामडी पालक मंगेश तुळसकर, राजेंद्र बावणे उपस्थित होते.

प्रमुख अतिथी सुरेश डांगे, श्रीहरी सातपुते यांनी आपले मनोगत व्यक्त केले.राष्ट्रसंत तुकडोजी महाराज मुक बधीर विद्यालय तर्फे आयोजित राष्ट्रीय दिव्यांग दिन व क्रीडा स्पर्धांच्या कार्यक्रमाचे उद्घाटन मान्यवरांचे हस्ते दीप प्रज्वलन करून व महापुरुषांच्या फोटोला माल्यार्पण करून करण्यात आले.यावेळी मुक बधीर विद्यार्थ्यांनी कोळी नृत्य सादर करून उपस्थित पालकांचे लक्ष वेधून घेतले होते. क्रीडा क्षेत्रात गुणवंत ठरलेल्या विद्यार्थ्यांना पाहुण्यांचे हस्ते सन्माचिन्ह देण्यात आले.

कार्यक्रमाचे संचालन कल्पना महाकाळकर यांनी केले व प्रास्ताविक व आभार प्रदर्शन मुख्याध्यापक रामदास कामडी यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी धर्मदास पानसे, भूपेंद्र गरमडे, उद्धव खोब्रागडे, ताराचंद बोरकुटे, अशोक विभुते, पटवारी कोहपरे, राजू बनसोड, दिलीप ऊरकूडे, दिलीप चौधरी, श्रुती मुन, चंद्रभागा वांढरे विद्यालयच्या कर्मचाऱ्यांनी सहकार्य केले.

शेळी होऊन शंभर दिवस जगण्या पेक्षा……!

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here