✒️सिद्धार्थ दिवेकर(उमरखेड प्रतिनिधी)
उमरखेड(दि.3डिसेंबर):-गोपिकाबाई सिताराम गावंडे महाविद्यालय, उमरखेड येथे तालुकास्तरीय क्रीडा 400 मीटर धावण्याच्या स्पर्धेत उमरखेड विभागातून कु. प्रतिक्षा बाबाराव कदम वर्ग दहावा या विद्यार्थिनीची निवड झाली. यापूर्वीही याच विद्यालयातील हॉलीबॉल संघाचा अंतिम टप्प्यापर्यंत याचमुने झेप घेतली होती. पण यश आले नाही. त्याची उणीव धावण्याच्या 400 मीटर क्रीडा स्पर्धेत विद्यालयाची *जिजाऊ* *प्रतिक्षा बाबाराव कदम* हिने तालुक्यातून प्रथम क्रमांक पटकावला त्याबद्दल विद्यालयाच्या वतीने शारीरिक शिक्षक शेख सत्तार व प्रतीक्षाचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले.
त्याचबरोबर या शनिवारला विद्यालयात चालता बोलताचे सहावे पुष्प घेण्यात आले. यावेळेस बक्षिसाचे आयोजक इंग्रजी विषयाचे प्रमुख तथा शारीरिक शिक्षक शेख सत्तार सर यांनी रंगीत पेन्सिलचे तिन बॉक्स देण्यात आले. यावेळेस प्रथम बक्षीस *आदित्य संतोष कदम* वर्ग सातवा दुसरे बक्षीस कु. *निकिता विश्वंभरराव कदम* वर्ग दहावा तर तिसरे बक्षीस कु. *सानिका विनायकराव शिंदे* वर्ग दहावा या विद्यार्थ्यांना मिळाले. खरोखर विद्यार्थ्यांमध्ये या चालताबोलता कार्यक्रमामुळे एक स्पर्धात्मक चढाओढ तयार झाली कठीण कठीण प्रश्नाचे सुद्धा विद्यार्थी उत्तरे देऊ लागले यावर मुख्याध्यापकांनी मनोगत व्यक्त केले असता की,पुढच्या स्पर्धा परीक्षेची आम्ही आज तुमच्याकडून पायाभरणी करून घेत आहोत. भविष्यात तुम्ही जिल्हाधिकारी शिक्षणाधिकारी व्हिडिओ असे मोठे मोठे अधिकारी आपण झाले पाहिजे.
याचा सर्व विद्यार्थ्यांनी महादिप चालता बोलता व परिपाठाच्या माध्यमातून सामान्य ज्ञानचे प्रश्न विद्यार्थी आवडीने अभ्यास करीत आहेत. खरोखर हा उपक्रम कौतुकास्पद आहे. असे विचार मुख्याध्यापक प्रल्हादराव मिरासे यांनी मांडले तर या कार्यक्रमाला दिनेश वानरे दिगंबर माने राजेश सुरवसे सौ. मीनाताई कदम भागवत कबले मारुती महाराज अरविंद चेपुरवार यांची उपस्थिती होती. चालता बोलताचा हा उपक्रम अतिशय सुंदर आवाजात श्री अनिल धर्माजी अल्लडवार सरांनी याचे नियोजन केले. विद्यार्थी वर्ग अतिशय खुश झाला व पुढच्या शनिवारचे बक्षिसाचे आयोजक विद्यालयाचे गणित शिक्षक श्री वानरे सर यांनी जाहीर केले. या उपक्रमाची नोंद ज्ञानप्रकाश शिक्षण संस्था उमरखेडचे प्रमुख आदरणीय *श्री युवराज पाटील देवसरकर* यांनी सुद्धा या उपक्रमास भरभरून शुभेच्छा दिल्या व इतर विद्यालयानी सुद्धा हा उपक्रम राबवावा अशी सर्वांना सूचना दिली.