✒️कोरची(पुरोगामी न्यूज नेटवर्क)
कोरची(दि.3डिसेंबर):- राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जिल्हाध्यक्ष रविंद्र वासेकर यांच्या अध्यक्षतेखाली कोहका ग्राम येथे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने “वेध भविष्याचा – विचार राष्ट्रवादीचा” तालुकानिहाय शिबिराचे आयोजन केले होते. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सर्वेसर्वा शरद पवार साहेब यांच्या वाढदिवसाचे ओचित्य साधून संपूर्ण महाराष्ट्र मध्ये शरद पवार साहेबांचे विचार जनमानसात पोहचावे या उद्देशाने या शिबिराचे आयोजन करण्यात येत आहे. यांची सुरुवात गडचिरोली जिल्ह्यात कोरची तालुक्यापासुन झाली आहे.
यावेळी कार्यक्रमाचे उपाध्यक्ष म्हणून राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या नागपूर विभागीय अध्यक्षा तथा महिला जिल्हाध्यक्षा शाहीनभाभी हकीम, प्रमुख प्रवक्ते तसेच मुख्य मार्गदर्शक म्हणून राष्ट्रवादी अल्पसंख्यांक विभाग महाराष्ट्र राज्य प्रदेश उपाध्यक्ष डॉ. एस. एन. पठाण, राष्ट्रवादी काँग्रेस वक्ता सेलचे जिल्हाध्यक्ष सुरेंद्र अलोणे, सामाजिक कार्यकर्ते डॉ. सुनिल कोहाड, कोरची तालुकाध्यक्ष सियाराम हलामी, शहर अध्यक्ष अविनाश हुमणे, महिला तालुका अध्यक्ष गिरीजा कोरेटी, तालुका उपाध्यक्ष नकुल सहारे, कोहका ग्रा.पं. सरपंच रविता हलामी, उपसरपंच ममता सहारे, पोलीस पाटील समुंद सांगसुरवार, ग्रामपंचायत सदस्य महगुजी घाटघूमर, माजी सरपंच सुमनताई हलामी, पेसा कायदा अध्यक्ष रतनलाल घाटघुमर, तंटामुक्ती अध्यक्ष प्रभुदास कोचे, निर्मलाबाई देवांगण, प्रियंका लोकेशचावर, जैनलाल दिवांगण, प्रिरीत घुघवा, कृष्णा देवांगन, पुष्पाबाई घुघवा, विमलाबाई देवांगण, सुलोचना घुघवा, ज्ञानवंती दूधकवर, दुखूराम देवांगण, रेखलाल देवांगण, तसेच मोठ्या संख्येने गावकरी व पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.