मनोहर गोरगल्ले(पुणे जिल्हा प्रतिनिधी)
राजगुरुनगर(दि.4डिसेंबर):-क्षेत्र निमगाव खंडोबा येथे तालुकास्तरीय शालेय विद्यार्थी वय १४ वर्ष,१७ वर्ष,१९ वर्ष, व मुली १४ वर्ष, १७वर्ष, १९वर्षीय वयोगटातील तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धाचे आयोजन क्रीडा व युवक सेवा संचालनालय महाराष्ट्र राज्य पुणे अंतर्गत जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय पुणे व खेड तालुका क्रीडा अधिकारी कार्यालय खेड, खेड तालुका क्रीडा शिक्षक संघटना व न्यू इंग्लिश स्कूल निमगाव यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आले.
कार्यक्रमाचे अध्यक्ष व उद्घाटन माननीय श्री दिलीप अण्णा मोहिते पाटील लोकप्रिय आमदार खेड तालुका यांच्या हस्ते करण्यात आले या कार्यक्रमाला प्रमुख उपस्थित धैर्यशील आप्पा पानसरे, निमगावच्या सरपंच सौ. शुभांगीताई भालेकर, ग्रामपंचायत सदस्या रूपाली काळे, मनोज खांडेभराड, रोहनभैया मोहिते,उपसरपंच संतोष शिंदे, माजी सरपंच बी टी शिंदे, भगवान शिंदे, दशरथशेठ शिंदे पाटील, व मान्यवर उपस्थित होते.
कार्यक्रमाचे आयोजन पैलवान.राजकुमार शिवाजी राऊत अध्यक्ष महाराजा कबड्डी संघ निमगाव, रामदास रेटवडे अध्यक्ष तालुका क्रीडा शिक्षक संघटना,श्री लतीफ शेख सचिव तालुका क्रीडा शिक्षक संघटना, श्री मिलिंद सोनवणे मुख्याध्यापक न्यू इंग्लिश स्कूल निमगाव, सौ प्रतिभा वळसे क्रीडा शिक्षक न्यू स्कूल निमगाव यांनी केले. यावेळी तालुक्यातील मुलांच्या १०२ शाळेंच्या संघांनी भाग घेतला असून मुलींच्या ६८ संघांनी भाग घेतला आहे. फेडरेशनचे रामदास फुगे, प्रकाश गाडे राजन कांबळे सतीश घाडगे, बंटी साबळे, उमेश गाडगे, असे एकूण बारा पंच काम करत होते. आदर्श विद्यालय आंबोली, पोद्दार इंटरनॅशनल स्कूल चाकण, द्वारका हायस्कूल चाकण, भैरवनाथ विद्यालय कुरुळी, जवाहर विद्यालय चाकण, न्यू इंग्लिश स्कूल काळुस, डायनामिक प मेमोरियल हायस्कूल, प्रियदर्शनी हायस्कूल चाकण, रामभाऊ म्हाळंगी विद्यालय भोसे,अशा अनेक शाळांनी भाग घेतला होता.
आमदार दिलीप शेठ मोहिते पाटील अध्यक्षीय भाषणात सांगितले की कबड्डी खेळ काळाची गरज असून मुलांनी कबड्डी खेळली पाहिजे. त्यामुळे शरीर तंदुरुस्त व निरोगी राहते यावेळी त्यांनी तालुका क्रीडा शिक्षकांना कार्यक्रमाचे चांगले नियोजन केल्याने धन्यवाद दिले त्याचप्रमाणे महाराजा कबड्डी संघाचे अध्यक्ष राजकुमार राऊत यांना कबड्डी खेळाचा छंद असून त्यांनी चांगले आयोजन केल्याबद्दल त्यांना सुद्धा यावेळी धन्यवाद दिले. माजी सरपंच शिवाजीराव यांनी मान्यवरांचे आभार मानले तर प्रस्तावित संतोष काळे यांनी केले.