🔸फसवणुक झालेले युवक होणार मोर्चात सहभागी
✒️रोशन मदनकर(उप संपादक)
गडचिरोली(दि.3डिसेंबर):-जिल्ह्यातील सूरजागड येथील खदान सुरू करत असताना राज्याचे तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, लायंड मेटल कंपनी यांनी एटापल्ली तालुक्यातील नागरिकांना रोजगार निर्मितीच्या उद्देशाने गडचिरोली येथील शासकीय कार्यक्रमात 18 फेब्रुवारी 2019 रोजी स्टार्टअप इंडिया (गती) योजने अंतर्गत ट्रकच्या चाव्या दिल्या व सुरजागड खदानीत ट्रक लावून देण्याचे आश्वासनही दिले मात्र कार्यक्रमाच्या दुसऱ्याच दिवशी लाभार्थ्यांकडून ट्रकचे पासिंग करून आणण्याच्या कारणाने त्या ट्रक परत घेण्यात आल्या मात्र तीन वर्षे लोटून गेले असताना देखील लाभार्थ्यांना अजूनही ट्रक मिळालेल्या नाही.
ट्रक मिळवून देण्याकरिता लाभार्थ्यांकरून सबसिडीच्या नावावर बँकेकडून लोन देखील करून देण्यात आले होते. लाभार्थ्यांच्या डोक्यावर आता कर्जाचे ओझे झाले असताना तत्कालीन मुख्यमंत्री व विद्यमान उपमुख्यमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री आणि सध्याच्या सरकारने देखील या लाभार्थ्याकडे पूर्णपणे दुर्लक्ष केलेले दिसते त्यांचे लक्ष केंद्रित करण्याकरिता एटापल्ली तालुक्यातील गती योजनेचे ट्रक न मिळालेले लाभार्थी गडचिरोली जिल्हा काँग्रेस कमिटी द्वारा आयोजित 14 ते 21 डिसेंबर 2022 दरम्यान नागपूर विधान भवनावर निघणाऱ्या पैदल मोर्चामध्ये सहभागी होणार आहेत.
सोबतच कायदेशीर न्यायालयीन लढाई देखील लढणार आहे या संदर्भात जिल्हाध्यक्ष महेंद्र ब्राह्मणवाडे यांना भेटून मोर्चात सहभागी होण्याबाबत व मोर्चाला पाठिंबा देण्याबाबत ट्रक न मिळालेल्या लाभार्थ्यांनी माहिती दिली. जिल्हाध्यक्ष महेंद्र ब्राह्मणवाडे यांनी लाभार्थ्यांना न्याय मिळवून देण्या करीता आपण पूर्ण सहकार्य करणार असल्याचे आश्वासन दिले यावेळी महेंद्र ब्राम्हणवाडे यांना निवेदन देताना लाभार्थी बंडू दारपेठी, मधुकर पुंगाटी, सैनु जोई, अजय शडमेक, दिलीप दहागावकर, रुपेश होळी, रामजी गोठा, संतोष आत्राम, बंडू वेल्दा, संजय गावडे, ईश्वर सडमेक सह अन्याय ग्रस्त लाभार्थी सोबत उपस्थित गडचिरोली तालुका काँग्रेस अध्यक्ष वसंतराव राऊत, सहकार सेल अध्यक्ष शामराव चापले, सरपंच संघटना जिल्हाध्यक्ष दिवाकर निसार, ढिवरू मेश्राम,आदी उस्थित होते.