Home चंद्रपूर चंद्रपूर येथे शिक्षक भारतीचा जिल्हा स्तरीय मेळावा

चंद्रपूर येथे शिक्षक भारतीचा जिल्हा स्तरीय मेळावा

146

🔸दिनांक ४ डिसेंम्बर २०२२ ला सरदार पटेल महाविद्यालय चंद्रपूर येथे मेळावा

🔹बहुसंख्य शिक्षक बांधवानी मेळावाल्या उपस्थित राहण्याचे शिक्षक भारतीचे जिल्हा अध्यक्ष भाष्कर बावनकर यांचे आव्हान

✒️रोशन मदनकर(उप संपादक)

चिमूर(दि.2डिसेंबर);-चंद्रपूर जिल्हा माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षक भारती संघटनेचा भव्य जिल्हा मेळावा रविवार दिनांक ४ डिसेंबर रोजी सरदार पटेल महाविद्यालय गंज वार्ड चंद्रपूर येथे आयोजित करण्यात आला आहे.या भव्य मेळाव्याच्या उद्घाटन चंद्रपूर विधानसभा आमदार किशोरभाऊ जोरगेवार तर मेळावाच्या अध्यक्ष संचालक डॉ.विजय देवतळे .प्रमुख मार्गदर्शक आमदार कपिल पाटील विधान परिषद महाराष्ट्र राज्य मुंबई.

प्रमुख पाहुणे माजी आमदार वामनराव चटप राजुरा,प्रशांत पोटदुखे चंद्रपूर, संदीपभाऊ गड्डमवार सावली,जिग्नेशभाई पटेल चंद्रपूर ,केशव जेणेकर सचिव चंद्रपूर,संघटनेचे राज्य उपाध्यक्ष राजेंद्रजी झाडे, भाऊराव पत्रे,संजय खेडेकर ,किशोर भाऊ वरभे,
सपन नेहरोत्रा सुरेश डांगे विभागीय कार्यकारिणी यांची उपस्थित राहणार आहे

मेळाव्यात शिक्षक-शिक्षकेतर कर्मचाऱ्यांवरील होणारे अन्याय, शासनाचा शिक्षण क्षेत्राकडे पाहण्याचा दृष्टिकोन,संघटनेची भूमिका,या वर मेळाव्यात विस्तुत मार्गदर्शन करण्यात येणार आहे.

सदरचा मेळावा यशस्वी करण्यासाठी शिक्षक भारतीचे शिक्षक व शिक्षकेतर संघटनेचे पदाधिकारी, कार्यकर्ते, सक्रिय सदस्य मेहनत घेत आहेत.

…तेही आपलेच भाऊबंद आहेत की हो!

तरी या भव्य जिल्हा मेळाव्याला संघटनेचे पदाधिकारी, कार्यकर्ते, सदस्य तथा शिक्षकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन संघटनेचे कार्यतत्पर चंद्रपूर जिल्हाध्यक्ष भाष्कर बावनकर यांनी केले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here