✒️सुयोग सुरेश डांगे(चिमुर प्रतिनिधी)
चिमूर(दि.2डिसेंबर):-प्रेरणादायी विरांगणा मुग्दाई आदिवासी सेवा चॅरिटेबल ट्रस्ट डोमा यांच्या वतीने मुग्दाई पहाडी परिसर डोमा येथे नुकतेच विरांगणा मुग्दाई जयंती व आदिवासी माना जमातीचा सांस्कृतिक नागदिवाळी समारोह तथा जेष्ठ समाज सेवकांचा सत्कार समारोह संपन्न झाला.
या कार्यक्रमाचे अध्यक्ष नागपुरचे जेष्ठ समाज सेवक बळीराम गरमळे तसेच पाहुणे म्हणुन डॉ. प्रा.भगवान नन्नावरे,अखिल भारतीय आदिवासी धर्म परिषदेचे महासचिव प्रेमशाही मुंडा झारखंड, मेघलाल मुंडा,पंकज सिरका,अभय भुटकुवर,विश्वनाथ वाकडे,चिमुर विधानसभा क्षेत्राचे आमदार कीर्तीकुमार भांगडीया, आरमोरी विधानसभा क्षेत्राचे आमदार क्रिष्णा गजभे, माजी राज्यमंत्री डॉ. रमेशकुमार गजभे आदी मान्यवर प्रामुख्याने उपस्थित होते.
याप्रसंगी अखिल भारतीय आदिवासी धर्म परिषदेचे महासचिव प्रेमशाही मुंडा यांनी आदिवासी धर्माची नोंद येणाऱ्या जनगणनेत करावी तसेच संस्कृती जतन करण्याचे आवाहन केले. यावेळी समाजातील प्राविण्यप्राप्त विद्यार्थ्याचे सन्मान चिन्ह देवून सत्कार करण्यात आला.
कार्यक्रमाचे सुत्रसंचालन सुभाष नन्नावरे यांनी केले. उपस्थितांचे आभार निका श्रीरामे यांनी मानले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी प्रा. रामराव नन्नावरे, धनंजय दडमल, पुरुषोत्तम रंधये, सुरेश गायकवाड, गोवर्धन चौधरी, दशरथ नन्नावरे आदीने अथक परिश्रम घेतले. कार्यक्रमाला परिसरातील समाजबांधव बहुसंख्येने उपस्थित होते. या कार्यक्रमाच्या दरम्यान नशामुक्ती शिबिर,रक्तदान शिबिर व आदिवासी सांस्कृतीक कार्यक्रम घेण्यात आले.