✒️पुणे(पुरोगामी न्यूज नेटवर्क)
पुणे(दि.1डिसेंबर):-मुंबईतील ऑल डे, नेबरहूड स्टाईल कॅफे व डेझर्ट बार चेन पोएट्री बाय लव्ह अँड चीजकेकने नोव्हेंबरमध्ये पुण्यातील कोरेगाव पार्क आणि बालेवाडी हाय स्ट्रीट येथे आपल्या सेवेची सुरूवात केली आहे.
मुंबईतील लोकप्रिय कॅफे आणि डेझर्ट डेस्टिनेशन पोएट्री बाय लव्ह अँड चीजकेक ने बालेवाडी हाय स्ट्रीट आणि कोरेगाव पार्कमध्ये आपल्या दोन नवीन आउटलेटची सुरूवात केली आहे. ही दोन्ही आउटलेट सकाळी ८ ते मध्यरात्री १२ पर्यंत ग्राहकांसाठी खुली राहतील.
पुण्यातील सर्व वयोगटातील ग्राहकांसाठी येथे विविध प्रकारचे ब्रेकफास्ट, लंच आणि डिनरची मेन्यू आहेत, आणि हे आठवड्यातील सातही दिवस सुरू असणारे पुण्यातील खास हँगआउट स्पॉट आहेत. सुंदर सजावटीच्या आकर्षक अश्या या नवीन आऊटलेट्समध्ये अंडी, पॅनकेक्स, वॅफल्स, हॅण्डक्राफ्टच्या छोट्या प्लेट्स, सँडविच, सॅलड्स, ग्रिल्स अश्या विविध मेन कोर्सच्या ऑल डे मेनूचा समावेश आहे. याचसोबत ग्लूटेन-फ्री आणि विविध शाकाहारी पदार्थ, बेक प्रोडक्ट, कॉफीची विस्तृत श्रेणी देखील आहे.
पोएट्रीची फ्रेश प्रेस्ड कॉफी, कित्येक चवदार पदार्थ, विविध पुस्ताकांनी आणि आरामदायी आसन क्षेत्राने सजवलेल्या या आउटलेट्सचे मनमोहक वातावरण पुण्यातील ग्राहकांना निश्चीतच आकर्षित करेल. याचसोबत त्यांच्या दोन्ही आउटलेटवर ईन हाऊस ज्युसचे, कॉफिचे विविध पर्याय व स्मूदी बार देखील आहे. हे दोन्ही आउटलेट्स पेट फ्रेंडली असुन येथे तुम्ही तुमचे पाळीव प्राणी देखील आणू शकता. २०१६ मध्ये या ब्रँडने ‘पोएट्री’ ची सुरूवात केली , जे दिवसभर चालु असणारे नेबरहूड स्टाईल कॅफे आहे जे अमेरिकन-युरोपियन फेर आणि क्लासिक बेवरेजस पद्धत्तीचे आहे.
विंटरबेरी पर्पल, लेन नंबर ८, अशोक चक्र सोसायटी, मीरा नगर, कोरेगाव पार्क आणि २१, जीएफ, बालेवाडी हाय सेंट, लक्ष्मण नगर, बालेवाडी या ठिकाणी सुरू करण्यात आलेल्या या दोन्ही आउटलेट्समध्ये ग्राहकांना अतिशय उत्कृष्ट आदरातिथ्य, स्टायलिश इंटिरियर्स, वाजवी किंमत आणि विविध प्रकारच्या चविष्ट मेनूंचा अनुभव घेता येईल . या ग्रुपचे प्रसिद्ध डेझर्ट आर्म लव्ह अँड चीज़केक एक दशकाहून अधिक काळापासुन उत्कृष्ट दर्जाचा बेक्ड प्रोडक्ट बनले आहे.
२०१२ मध्ये ३०० चौरस फूटांच्या प्रायोगिक किचन ने सुरू झालेला हा ब्रॅंड आज मुंबईतील टॉप डेझर्ट डेस्टिनेशन्सपैकी एक बनला आहे, ज्याला मोठमोठे कलाकार, चित्रपटक्षेत्रातील विविध हस्ती, उद्योगपती आणि मीडिया व्यावसायिकांनी पसंती दिली आहे.
कोरेगाव पार्क आणि बालेवाडी येथील पोयेट्री बाय लव्ह अँड चीजकेक भारतातील या ब्रँडचे २३वे आणि २४वे आउटलेट बनले आहे. मुंबई, दिल्ली आणि पुणे येथील त्यांच्या आऊटलेट्ससाठी या ब्रॅंडच्या संस्थापिका रुचिता भाटिया आणि शेफ अमित शर्मा यांनी ७२ हून अधिक अद्वितीय फ्लेवर्सचा एक खास मेनू तयार केला आहे जिथे अतीशय स्वादिष्ट चीजकेक्स आणि विविध केकपासून ते कित्येक बेक पदार्थ आणि गोड पदार्थ असे खुप काही आहे. या वर्षाच्या सुरुवातीला या ब्रँडने डीएलएफ सायबर हब, गुरुग्राममध्ये पोएट्री बाय लव्ह अँड चीजकेक आणि दिल्लीच्या डिफेन्स कॉलनीमध्ये लव्ह अँड चीजकेक चे लाँचीग केले. पुण्याचे हे नवीनतम आउटलेट त्यांच्या व्यवसायाला १० वर्षे पूर्ण झाल्या निमित्ताने देशभरातील त्यांच्या विस्तार योजनेचा एक भाग आहे.
को फाऊंडर व शेफ अमित शर्मा म्हणाले, “पोएट्री बाय लव्ह अँड चीजकेक पुण्यात आणताना आम्हाला आनंद होत आहे.आमच्या ग्राहकांना आम्ही स्वादिष्ट, उच्च दर्जाचे, वाजवी किमतीचे आमचे खास पदार्थ प्रस्तृत करण्यासाठी अतिशय उत्साही आहोत. या आउटलेट्सच्या उद्घाटनांसह, आम्ही पुण्यातील ग्राहकांसाठी फुल इंग्लिश ब्रेकफास्ट, हॅश ब्राउन पोटॅटो पॅनकेक्स, ट्रफल्ड एग्ज, फ्रेंच टोस्ट आणि हॅम आणि चीज क्रोइसंट यासारखे आमचे आवडते मेनू आणण्यासाठी कमालीचे उत्साहित आहोत.
सह-संस्थापिका रुचिता भाटिया पुढे म्हणाल्या, “पुण्यात विस्तार करणे हा मागील काही काळापासून आमचा अजेंडा होता. आमचे हे कोजी कॅफे या शहरात आणण्यासाठी आम्ही खूप उत्सुक आहोत.
फ्रेश नॅचरल, स्वादिष्ट पदार्थ प्रेमाने ग्राहकांन सर्व्ह करणे हा आमचा उद्येश्य आहे. खाद्यपदार्थांच्या पलीकडे जाऊन, आम्ही ग्राहकांसाठी आमचे क्युरेट कम्फर्ट फूड आणि डेझर्टचा आनंद घेण्यासाठी सुंदर जागा तयार केल्या आहेत. या आउटलेट्स द्वारे आम्ही हवेशीर, सु-प्रकाशित अंतर्भाग आणि अल्हाददायक व परिपूर्ण हँगआउट स्पॉट्स ऑफर करतो, जिथे प्रत्येकाचे स्वागत आहे आमचे पुण्यातील दोन्ही आऊटलेट्स पोएट्री बाय लव्ह अँड चीजकेक ग्राहक सेवेसाठी सज्ज आहेत.
3 डिसेंबर 2022 रोजी ब्रँडच्या मुंबई, पुणे आणि दिल्ली येथील त्यांच्या सर्व आउटलेटमध्ये आकर्षक ऑफरसह नॅशनल चीजकेक डे साजरा केला जाईल. जिथे केवळ एका दिवसासाठी प्रति चीजकेक स्लाइस फक्त रु. १०० आणि अन्य सर्व केकवर ५० % सूट देण्यात येईल.